मुक्तानंद विद्यालयाची यशाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:28 PM2021-07-26T22:28:39+5:302021-07-26T22:28:39+5:30
येवला : येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेत सुयश प्राप्त करून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
येवला : येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एमटीएस परीक्षेत सुयश प्राप्त करून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमृतसा पहिलवान, सेक्रेटरी दीपक गायकवाड यांच्या हस्ते राज्यात सतरावा आलेल्या आदित्य रामदास खैरनार, तालुका पारितोषिक प्राप्त जयेश केवलसिंग गिरासे यांचा सन्मान करण्यात आला. एमटीएस २०२० परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही परीक्षा २३ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत आदित्य रामदास खैरनार या विद्यार्थ्याने इ.१० वी एमटीएस परीक्षेत २०० पैकी १४६ गुण मिळवून राज्यात १७ वा क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातील जयेश केवलसिंग गिरासे यास तालुका पारितोषिक तर यश नितीन भागवत, चैतन्य गजेंद्र पहिलवान, वैभवी दत्तात्रय माळवे, शुभम सोमनाथ मोरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहेत. कार्यक्रमास प्राचार्य मुरलीधर पहिलवान, उपप्राचार्य अंबादास ढोले, गजेंद्र धिवर, पर्यवेक्षक अरूण विभूते यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी यांनी केले.