नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:06 PM2018-04-28T18:06:59+5:302018-04-28T18:06:59+5:30

सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

The multi-functional sprayer machine made by Tejas in the ninth | नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देनववीच्या विद्यार्थ्यांने साकारली जुगाड तंत्रज्ञानाची भन्नाट कल्पनायवतमाळच्या तेजस काळेने सायकलच्या पार्टपासून बनवले फवारणी यंत्रजागतिक कृषी महोत्सवात फवारणी यंत्राने वेधले शेतकऱ्यांचे लक्ष

नाशिक : सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवार (दि.25) पासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील तेजस काळे याने शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतऱ्यांचे कष्ट आणि समस्या अतिशय जवळून पाहिल्या आहेत. ऐन बहरात असलेल्या पिकावर अचानक किडीचा प्रादुर्भाव होऊन ते भुईसपाट होताना आणि फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतानाही कोवळ्या वयात बघितलेल्या तेजसने शेती क्षेत्रात काम करून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नातून तेजसने सायकलचे जुने टाकाऊ चाक, प्लॅस्टिक कॅन, प्लॅस्टिकचे नळ, टाकाऊ पाईपचे तुकडे, नोझल व पिस्टन सारखे साहित्य वापरून बहुउपयोगी फवारणी यंत्र तयार केले आहे. हे फवारणी यंत्र हाताळण्यास अतिशय सोपे असून महिलाही ते सहज वापरू शकतात. औषधाचा साठाही यंत्रावर फिरवणे शक्य असल्याने फवारणी यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे खांद्यावरचे ओझे कमी होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे तेजस यंत्राची माहिती देताना सांगतो. शेतकऱ्यांच्या घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून या यंत्राची निर्मिती केली असल्याने त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. फवारणी यंत्र शरीरापासून दूर व पुढे ढकलता येणारे असल्याने त्यापासून विषबाधा होण्याची शक्यता कमी असून, देखभाल व दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प असलेल्या या यंत्रमुळे कापूस, तूर, द्राक्ष, टमाटा व अन्य पालेभाज्या व फळभाज्यांना एकसारखी फवारणी करणे शक्य असल्याचा विश्वास लहानगा नवसंशोधक तेजस काळे याने व्यक्त केला आहे.

शेत राखणीसाठी कटकटी यंत्र
पीक कापणीला आले असताना जंगली प्राणी व पक्ष्यांपासून राखणी करण्यासाठी शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस राखण करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन जळगावच्या बोदवड तालुक्यातील साळशिंग येथील प्रतापराव देशमुख यांनी जुना पत्र्यापासून बनवलेली फिरकी डब्याला जोडून कटकटी यंत्र तयार केले आहे. हवेच्या वेगाने फिरकी फिरून शेतात डबा वाजवल्याचा आवाज येत असल्याने शेतात उपद्रवी प्राणी-पक्षी फिरकत नसल्याने हे कटकटी यंत्र शेतकऱ्याचे पीक राखणीसाठी मदत करणारे असल्याचे देशमुख सांगतात.

Web Title: The multi-functional sprayer machine made by Tejas in the ninth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.