बहुसदस्यीय प्रभाग पद्धती मतदारांचे प्रबोधन

By Admin | Published: January 22, 2017 12:50 AM2017-01-22T00:50:37+5:302017-01-22T00:51:11+5:30

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती मतदारांचे प्रबोधन

Multilateral ward system awareness awaiting voters | बहुसदस्यीय प्रभाग पद्धती मतदारांचे प्रबोधन

बहुसदस्यीय प्रभाग पद्धती मतदारांचे प्रबोधन

googlenewsNext

नाशिक : महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविली जाणार असल्याने मतदारांचे जाहिराती, व्हिडिओ क्लिपद्वारे प्रबोधन करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यंदा मतांचा टक्का वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याची जबाबदारी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.  यंदा प्रथमच प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. १९९२ मध्ये महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आली त्यावेळी एक वॉर्ड एक सदस्य पद्धती होती. या पंचवार्षिक काळात ८५ सदस्य होते. १९९७ मध्येही एक सदस्यीय प्रभागरचना होती, मात्र सदस्यसंख्येत दोनने भर पडत ती ८७ झाली. २००२ च्या निवडणुकीत पहिल्यांदा तीन सदस्यीय प्रभागरचना अस्तित्वात आणली गेली. त्यावेळी सदस्यसंख्या १०८ होती. मात्र, तीन सदस्यीय प्रभाग रचना अयशस्वी ठरल्याने पुन्हा सन २००७ मध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना आणली गेली. त्यावेळी सदस्यसंख्या मात्र १०८ कायम ठेवण्यात आली होती. २०१२च्या निवडणुकीत पुन्हा बदल करण्यात येऊन द्विसदस्यीय प्रभाग रचना अंमलात आणण्यात आली. त्यावेळी सदस्यसंख्या १२२ होती. फक्त प्रभाग क्रमांक १५ आणि १९ मध्ये प्रत्येकी तीन सदस्य असणार आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती सरकारने आणल्याने त्याबद्दल होणाऱ्या गुंतागुतीबाबत याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती.

Web Title: Multilateral ward system awareness awaiting voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.