मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 04:39 PM2018-02-28T16:39:55+5:302018-02-28T16:39:55+5:30

वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासू पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे.

Mumbai-Agra highway: Six-month-old leopard killed in a road accident | मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार

मुंबई-आग्रा महामार्ग : भरधाव वाहनाच्या धडकेत सहा महिन्याचा बिबट्या ठार

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्गावर पहाटे अपघात विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत वन्यजीवांचा वावर बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा

नाशिक : भरधाव वाहनाच्या धडकेत बुधवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास सहा महिन्यांचा बिबट्याचा नर बछडा जागीच ठार झाला. घटनेची माहिती समजताच इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या वन अधिकारी-कर्मचा-यांनी घटनास्थळी सकाळी धाव घेऊन पंचनामा केला.
इगतपुरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत विल्होळी, वाडीव-हे, गोंदे, पाडळी, मुंढेगाव, घोटी या भागात बिबट्याचा वावर आढळतो. भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात सहा महिन्यांचा बछडा मुंढेगाव शिवारातून महामार्ग ओलांडत असतान अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. परिसरातील नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तत्काळ बिबट्याचे शव महामार्गावरुन बाजूला करत रस्त्याच्या कडेला आणून ठेवले. घटनेची माहिती त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांना कळविण्यात आली. तत्काळ सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी-क र्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा केला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले. तत्काळ बिबट्याचा मृतदेह वनकर्मचा-यांनी ताब्यात घेऊन वाहनातून अंत्यसंस्कारासाठी हलविला.
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर वाहनाच्या वेगमर्यादा प्रचंड वाढली असून या भागात वनविभागाकडून वन्यप्राण्यांचा वावर असल्याचा सावधानतेचा इशारा देणारे फलकही अद्याप लावण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना याबाबत कुठलीही माहिती मिळत नाही. अचानकपणे महामार्गावर रात्री, मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास बिबट्या, रानमांजर, तरस यांसारखे वन्यजीव महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडतात.

महामार्गावरुन मार्गस्थ होताना वेगावर नियंत्रण ठेवणे हे वाहनचालकांसह वन्यजीवांसाठी फायद्याचे ठरणारे आहे. वाहनचालकांनी वन्यजीव अचानकपणे रस्त्यावर दिसल्यास किंवा वाहनाच्या प्रकाशात त्याचे डोळे लख्ख स्वरुपात चमक ल्यास वेग कमी करण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरुन अपघातात वन्यजीवांचा बळी जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.
वनविभागाने तातडीने नाशिक पश्चिम विभागाच्या हद्दीत पांडवलेणीपासून पुढे विल्होळी व थेट इगतपुरीपर्यंत महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या भागात वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देणारे फलक उभारणे गरजेचे आहे. जेणेकरुन वाहनचालकांना वन्यजीवांची वावर असल्याबाबतची माहिती मिळण्यास मदत होईल.
 

Web Title: Mumbai-Agra highway: Six-month-old leopard killed in a road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.