मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:18 PM2021-06-08T22:18:17+5:302021-06-09T01:03:11+5:30
मनमाड : मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी द्वि-साप्ताहिकवरून आठवड्यातून चार दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मनमाड : मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी द्वि-साप्ताहिकवरून आठवड्यातून चार दिवस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक ०१२२१ मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष गाडी ११ जूनपासून मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. गाडी क्रमांक ०१२२२ हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी विशेष दि. १२ जूनपासून बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच आठवड्यातून चार दिवस चालविण्यात येईल. पूर्णतः आरक्षित असलेल्या या विशेष ट्रेनच्या पुनर्संचयित फेऱ्यांचे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र व संकेतस्थळावर सुरू करण्यात आलेले आहे.
केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.