मुंबई नाका पोलिसांना अवैध धंद्यांचे आव्हान!

By admin | Published: January 31, 2016 10:47 PM2016-01-31T22:47:22+5:302016-01-31T22:51:59+5:30

झोपडपट्ट्यांमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण

Mumbai Naka Police Challenge Illegal Traffic! | मुंबई नाका पोलिसांना अवैध धंद्यांचे आव्हान!

मुंबई नाका पोलिसांना अवैध धंद्यांचे आव्हान!

Next

संजय शहाणे इंदिरानगर
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील झोपडपट्ट्यांमधील अवैध धंद्यांबाबतची वाढती स्पर्धा व त्यास असलेला राजकीय पाठिंबा असे दुहेरी आव्हान मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्यासमोर असून, या आव्हानास सामोरे जाण्यासाठी ते कोणते पाऊल उचलतात, यावरच या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणार की नाही याचे भवितव्य अवलंबून असणार आहे़
इंदिरानगर, भद्रकाली, अंबड व सरकारवाडा या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून मुंबई नाका पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली़ पोलीस ठाण्याच्या शुभारंभाप्रसंगीच दंगलीचा गुन्हा दाखल होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांना भारतनगर झोपडपट्टीतील गुंडांनी एकप्रकारे सलामीच दिली़ इंदिरानगर पोलीस ठाण्याची डोकेदुखी असलेला भारतनगर, शिवाजीवाडी, नंदिनीनगर हा परिसर मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत समाविष्ट झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे़
या परिसरातील मटका, जुगार, मद्यविक्री या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून धातूर-मातूर स्वरूपाची कारवाई केली जात असल्याने या धंद्यांमध्ये वाढ होत चालली आहे़ या अवैध धंद्यांच्या स्पर्धेतून हाणामारीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या असून, यादीवरील सराईत गुन्हेगारांचा मुक्त वावर या परिसरात असल्याचे पोलिसांच्या आॅपरेशनमधून समोर आले आहे़ जनावरांच्या हांडांच्या अनधिकृत गुदामांचा प्रश्न मोठा असून ही गुदामे हटविण्याची मागणीही नागरिकांनी अनेकदा केली आहे़
भारतनगर परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला अनैतिक व्यवसाय, महापालिकेच्या जागांची खरेदी-विक्री करणारी टोळी अन् या सर्वांना असणारा राजकीय पाठिंबा या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम मुंबई नाक्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना करावे लागणार आहे़

Web Title: Mumbai Naka Police Challenge Illegal Traffic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.