अवैध धंद्यांबाबत मुंबई नाका पोलीस अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:29 AM2018-01-22T00:29:32+5:302018-01-22T00:29:59+5:30
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक नेमके करते तरी काय व त्यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
इंदिरानगर : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक नेमके करते तरी काय व त्यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने वीस दिवसांपूर्वी भारतनगर परिसरातून जनावरांचे ४५० मांस जप्त करून अवैध कत्तलखानाही उद्ध्वस्त केला होता़ विशेष म्हणजे ही घटना ताजी असतानाच युनिट एकने पुन्हा भारतनगर परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी उपाशीपोटी बांधून ठेवलेल्या पाच गोºह्यांची सुटका केली़ मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भारतनगर परिसरात सुरू असलेले अवैध कत्तलखाने आणि अवैध धंद्यांची गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनला माहिती मिळते व कारवाईही केली जाते, मात्र मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शोध पथकाला कळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़ मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत असलेले भारतनगर, नंदिनीनगर, शिवाजीवाडी या परिसरांत सुमारे ७ ते ८ हजार लोकांची वस्ती असून, मजुरांची संख्या अधिक आहे़ या परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली असली तरी अवैध धंदे कमी झाले नसून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ त्यामध्ये प्रामुख्याने मटका, जुगार, गांजा, अवैध मद्यविक्री व कत्तलखान्यांचाही समावेश आहे़ या ठिकाणी सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना नेमके अभय कोणाचे? असा सवाल नागरिकांकडून केला जातो आहे़