मुंबई पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले १०० कोटींचे ड्रग सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:07 AM2023-10-24T11:07:06+5:302023-10-24T11:09:31+5:30

Lalit Patil Drug Mafia News Update: रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हर, अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत, मुंबई पोलीस रातोरात पोहोचले नाशिकच्या ग्रामीण भागात

Mumbai police's midnight underwater search operation; Drugs worth 100 crores thrown in the river by Lalit Patil found in nashik | मुंबई पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले १०० कोटींचे ड्रग सापडले

मुंबई पोलिसांची मध्यरात्रीच पाण्याखाली शोधमोहिम; ललित पाटीलने नदीत फेकलेले १०० कोटींचे ड्रग सापडले

तुरुंगात असताना हॉस्पिटलाईज होण्यासाठी पायऱ्यांवरून पडण्याचे नाटक करणारा ड्रग माफिया ललित पाटीलने पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती दिली आहे. यानुसार मुंबई पोलिसांनी गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीच शोधमोहिम सुरु केली होती. पहाटेपर्यंत पोलिसांच्या हाती करोडोंचा ड्रगसाठा लागला आहे. 

ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांनी नाशिक सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातून जाणाऱ्या गिरणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग फेकले होते. ते शोधण्यासाठी पोलिसांनी रात्रीच मोठे ऑपरेशन राबविले होते. पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत सुमारे चार तास पाण्याखाली शोधमोहिम राबविली आहे. 

रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरची यासाठी मदत घेण्यात आली आहे. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने रात्रीच्या अंधारात पाण्याखालील ड्रग्जच्या पुड्या शोधण्यात आल्या आहेत. याबाबत अंधेरी साकीनाका पोलिसांनी नाशिक ग्रामीण च्या देवळा पोलीस ठाण्याला माहिती दिली असून तेथील पोलिसांनी स्थानिक पातळीवर बंदोबस्त देखील पुरविल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी नदीपात्रातून ड्रग्स शोधण्यासाठी काही वॉटरप्रूफ कॅमेऱ्यांचाही वापर केला तसेच बोटीमध्ये बसूनही संपूर्ण नदीपात्र पिंजून काढत ड्रग्जचा शोध घेतला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतीत माध्यमांना कुठलीही माहिती देण्यास नेहमीप्रमाणे असमर्थता दर्शविली आहे.

ललित पाटीलचा चालक सचिन वाघने हे ड्रग्जची पॅकेट्स पाण्यात फेकली होती. सुमारे दोन गोण्या भरून ही पाकिटे होती. ४० ते ५० किलो भरतील एवढा हा ड्रग साठा आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. देवळाजवळच्या सरस्वतीवाडी भागातून १५ किलोची पाकिटे मिळाली आहेत. 
 

Web Title: Mumbai police's midnight underwater search operation; Drugs worth 100 crores thrown in the river by Lalit Patil found in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.