सातपूरमध्ये घेतली मुंबईकरांनी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:03+5:302021-05-19T04:15:03+5:30
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आपोआप गर्दीवर नियंत्रण आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर फार ...
कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस ८४ दिवसांनंतर देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर आपोआप गर्दीवर नियंत्रण आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर फार कमी लोकांचे ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लस आहे पण लस घेणारे नाहीत. अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी कोविशिल्ड लस शिल्लक नसल्याने बुधवारी सातपूर विभागातील केंद्र बंद ठेवण्यात आले होते तर कोव्हॅक्सिन लस फक्त ईएसआय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली होती. कोव्हॅक्सिन लस घेण्यासाठीच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही तरीही ही लस घेण्यासाठी नागरिकांनी झुंबड केली नाही. ईएसआय रुग्णालयात कोव्हॅक्सिन लस दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांनी ईएसआय रुग्णालयात लस घेण्यासाठी धाव घेतली तर मुंबईच्या नागरिकांनीदेखील कोव्हॅक्सिन लस घेतली. आज दिवसभरात जवळपास ३०० नागरिकांना कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले.
इन्फो==
ईएसआय रुग्णालयात लसीकरण सुरू झाल्यानंतर लस घेण्यासाठी रांगाच रांगा लागत होत्या. उन्हातान्हात चार पाच तास ताटकळत उभे रहावे लागत होते तरीही प्रत्येकाला लस कशी देता येईल याचे दररोज नियोजन केले जात होते. एका दिवसाला ५०० डोस देण्याचाही प्रयत्न केला आहे म्हणूनच आतापर्यंत १५ हजार नागरिकांना लस देण्याचा उच्चांक गाठला आहे.
-डॉ. राजश्री पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआय रुग्णालय