मुंबईकरांचा दुधाच्या वाहनांतून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:05 AM2020-03-28T00:05:30+5:302020-03-28T00:06:04+5:30

देशात संचारबंदी लागू असताना अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पांढुर्ली चौफुली येथील चेकपोस्टवर पोलिसांकडून समज देण्यात येत आहे. दरम्यान, दुधाच्या वाहनातून काही नागरिक मुंबईहून गावाकडचा प्रवास करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. वाहनचालकासह संबंधिताना पोलिसांकडून उठाबशा व दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला.

Mumbai's journey through milk cartons | मुंबईकरांचा दुधाच्या वाहनांतून प्रवास

संचारबंदी असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांनी अशा उठबशा काढायला लावल्या.

Next
ठळक मुद्देदंडुक्याचा प्रसाद : चेकपोस्टवर उठबशा

सिन्नर : देशात संचारबंदी लागू असताना अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पांढुर्ली चौफुली येथील चेकपोस्टवर पोलिसांकडून समज देण्यात येत आहे. दरम्यान, दुधाच्या वाहनातून काही नागरिक मुंबईहून गावाकडचा प्रवास करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. वाहनचालकासह संबंधिताना पोलिसांकडून उठाबशा व दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला.
विनाकारण परिसरात व रस्त्यावर फिरणाºया या हुल्लडबाजांना पांढुर्ली चेकपोस्ट पोलिसांकडून धडा शिकवला जात आहे. काही नागरिक पोलिसांना दवाखान्याचे कारण सांगताना दिसले. परंतु पोलिसांना हुल्लडबाजांचा संशय येताच त्यांना अद्दल घडविली जात होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु तरीही मुंबईहून सिन्नर, संगमनेर, अहमदनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या करून दहा पंधरा लोक एकत्र प्रवास करताना आढळून आले. त्यांना चेकपोस्टवर अडवून पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला. संगमनेर येथील दुधाच्या गाड्यांमधून प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत. चालकालासुद्धा पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद खावा लागला.

Web Title: Mumbai's journey through milk cartons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.