आमळी गडावरून कोसळून मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:29 AM2018-03-25T01:29:18+5:302018-03-25T01:29:18+5:30

वाडीवहे शिवारातील गडगडसांगवी गावालगत असलेल्या आमळी गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या मुंबईच्या ‘चक्रम’ हायकर्स संस्थेच्या समूहातील एका ट्रेकर्सचा पाय घसरल्याने दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२४) घडली.

 Mumbai's trekker died due to rickshaw collapsing | आमळी गडावरून कोसळून मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू

आमळी गडावरून कोसळून मुंबईच्या ट्रेकरचा मृत्यू

Next

नाशिक : वाडीवहे शिवारातील गडगडसांगवी गावालगत असलेल्या आमळी गडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या मुंबईच्या ‘चक्रम’ हायकर्स संस्थेच्या समूहातील एका ट्रेकर्सचा पाय घसरल्याने दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.२४) घडली. वाडीवºहेपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आमळी पर्वतावर मुंबई येथील ‘चक्रम’ हायकर्स या प्रसिद्ध गिरीभ्रमंती करणाऱ्या संस्थेच्या १४ गिर्यारोहक ांचा समूह गिर्यारोहणासाठी दाखल झाला होता. आमळी गडालगत असलेल्या पायथ्याच्या दहेगावात हे गिर्यारोहक मुक्कामी थांबलेले होते.‘चक्रम’मार्फत २३ ते २५ मार्च दरम्यान आमळी गड (गडगड्या), रांजणगिरी, बहुला, कावनई अशा ट्रेकिंग मोहीम आखळी होती. प्रणव नाफ डे हे या मोहिमेचे प्रमुख, तर मंगेश पंडित हे उपप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. शनिवारी सकाळी गिर्यारोहकांनी आमळी गडावर चढाई करण्यास सुरुवात केली. या समूहातील काही ट्रेकर्स गडाच्या निम्म्यावर असलेल्या देवी मंदिरात विश्रांतीसाठी थांबले. गिर्यारोहणाच्या सर्व साहित्य घेऊन सज्ज असलेल्या या ग्रुपमधील गिर्यारोहक हे सातत्याने महाराष्टÑातील विविध गड-किल्ल्यांवर चढाई करतात. आमळी गडावरील अवघड अशी कडा सर करण्यासाठी दोरीची आवश्यकता भासते. सुरक्षेच्या कारणास्तव या कडावर दोरी ठोकण्यासाठी या समूहातील तिघे पुढे जात असताना हेमेंद्र सुरेश अधटराव (२७,रा.बोरिवली, मुंबई) या तरुण गिर्यारोहकाचा अचानकपणे पाय घसरल्याने ते शेकडो फूट खोल दरीत कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने हेमेंद्र यांचा मृत्यू झाला. हेमेंद्र हे पुण्यात नोकरीला राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. हेमेंद्र यांचा अचानकपणे पाय घसरल्याने त्यांचा दरीत तोल गेला. हेमेंद्र हे तरबेज गिर्यारोहक होते अनावधानाने त्यांचा पाय ज्या दगडावर पडला तो दगड निखळल्याने दुर्दैवी अपघात घडल्याचे सचिव अनिकेत रहाळकर यांनी सांगितले.
वैनतेय , गावकयांची धाव
‘चक्रम’च्या गिर्यारोहकांनी घटना स्थानिक वैनतेय गिरीभ्रमण संस्थेला कळविली. वैनतेयचे पथक सर्व आवश्यक साधनसामुग्री घेऊन वाडीवºहेच्या दिशेने रवाना झाले. ‘चक्रम’चे पथक गडावरील वरच्या बाजूने हेमेंद्र यांचा शोध घेत होते, तर वैनतेयचे दाखल झालेले पथक पायथ्याला दरीमध्ये शोध घेत होते. दरम्यान, गावकरीही मदतीसाठी धावले. ‘चक्रम’च्या पथकाला हेमेंद्र हे जखमी अवस्थेत सापडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
 

Web Title:  Mumbai's trekker died due to rickshaw collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात