कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणी मूक मोर्चा
By admin | Published: July 19, 2016 12:43 AM2016-07-19T00:43:39+5:302016-07-19T00:44:31+5:30
कारवाईची मागणी : दिंडोरी, घोटी, इगतपुरी, लासलगाव, विंचूर आदि ठिकाणी निषेध
दिंडोरी : कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरणी दिंडोरी तालुकवासीयांनी पक्षभेद विसरत एकत्र येत दिंडोरी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढला. तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देत घटनेचा निषेध केला.
नीळवंडी रोड येथून तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कृउबा उपसभापती अनिल देशमुख, सुनील आव्हाड, गंगाधर निखाडे, वसंत कावळे, सुनील जाधव, योगेश बर्डे, सोमनाथ जाधव, चंद्रकांत राजे, दिलीप जाधव, प्रमोद देशमुख, अविनाश जाधव, श्यामराव हिरे, तुषार वाघमारे, गणेश दवंगे, मंगेश जाधव, तौसिफ मणियार, राकेश शिंदे, प्रतीक जाधव, प्रभाकर जाधक, संपत कड, राजू बोरस्ते, नीलेश गटकळ, डॉ विजय गटकळ, बापू बोंबले, श्यामराव मुरकुटे, मंगेश शिंदे, संगम देशमुख, सीताराम जाधव, योगेश पेलमहाले, विजय पिंगळ, मयूर देशमुख,
यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी गंगाधर निखाडे व वसंत कावळे यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)