इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:21 PM2020-09-30T22:21:53+5:302020-10-01T01:12:01+5:30
नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्यापासून हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आलेल्या आदिवासी जनतेला खावटी अनुदान व आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांमधून मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे या मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन छेडत तेरावे घालण्यात येऊन तहसिलदार परमेश्वर कासुळे श्रमजीवीचे तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

यावेळी आदिवासी जनतेला अन्न आणि दर्जेदार शिक्षण यापासून वंचित ठेवणा-या आदिवासी विभागाचे तेरावे (उत्तरकार्य) कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे श्रमजीवी संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वीच इशारा देण्यात आला होता. त्याच पाश्वर्भूमीवर श्रमजीवी संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयासमोर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत व कोविड - १९ नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आदिवासी विभागाचे (उत्तरकार्य) तेराव्याचा कार्यक्रम केला असुन या आंदोलनात तालुकाध्यक्ष संजय शिंदे व युवक तालुकाध्यक्ष सिताराम गावंडा यांनी मुंडन करून निषेध व्यक्त करत आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
------------------
खावटी अनुदानासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने इगतपुरी तहसिल कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करतांना तालुकाध्यक्ष संजय शिंदे समवेत सिताराम गावंडा व इतर कार्यकर्ते. (३० नांदूरवैद्य१)