सिन्नरला मराठा आरक्षणासाठी मुंडन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 01:21 PM2020-09-17T13:21:49+5:302020-09-17T13:21:57+5:30
सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र येत डोक्याचे मुंडन करीत आगळ्या पध्दतीने आंदोलन करुन लक्ष वेधून घेतले.

मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघर्ष समिती यांच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह आमदार माणिकराव कोकाटे यांना निवेदन पाठविण्यात आले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सर्वच पक्षांतील आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स पाळून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन आमदारांच्या दारासमोर होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात शरद शिंदे यांच्यासह दौलत धनगर, संदीप लोंढे, अर्जून घोरपडे, मधुकर शिंदे, सुनील जगताप, बापू सानप, गणेश जाधव, नितीन पवार, शिवाजी गुंजाळ, राजेश घोडे, खंडू सांगळे, कृष्णा लहाने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.