सकल मराठा समाजाच्या तरुणांचे सरकाच्या निषेधार्थ मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:51 PM2018-08-02T13:51:28+5:302018-08-02T13:55:13+5:30

 मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करीत सल्याचा आरोप करीत सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात गुरुवारी (दि. 2)बोंबाबोंब आंदोलन करून मुंडण करून घेतले. आंदोलनक करणाऱ्या तरुणांवर सरकार तरुणांवर गुन्हे दाखल करत आहेत. मुलांना आत्महत्यास प्रवृत्त करत आहे.त्यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाने अशा प्रकारे तरुणांवर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रक्रार त्वरीत थांबवावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आसा इशारा सकल मराठा समाजाने सरकारला दिला आहे.

 Mundane by the protesters of the gross Maratha community | सकल मराठा समाजाच्या तरुणांचे सरकाच्या निषेधार्थ मुंडण

सकल मराठा समाजाच्या तरुणांचे सरकाच्या निषेधार्थ मुंडण

Next
ठळक मुद्देनाशकात मराठा समाजाचे सरकार विरोधात आंदोलन सुरूचमराठा क्रांती मोर्चाचे लाखलगावमध्ये मुंडण आंदोलनसरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या लाखलगाव येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करीत सल्याचा आरोप करीत सरकाच्या या वेळकाढू धोरणा विरोधात गुरुवारी (दि. 2)बोंबाबोंब आंदोलन करून मुंडण करून घेतले. आंदोलनक करणाऱ्या तरुणांवर सरकार तरुणांवर गुन्हे दाखल करत आहेत. मुलांना आत्महत्यास प्रवृत्त करत आहे.त्यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाने अशा प्रकारे तरुणांवर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रक्रार त्वरीत थांबवावा अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल आसा इशारा सकल मराठा समाजाने सरकारला दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अजूनही मोचक्का समाज रस्त्यावर उतरला आहेत. जेव्हा संपूर्ण समाज रास्तवर उतरेल तर महाराष्ट्र वेगळ्या वळणावर जाईल. असा इशारा देतानाच आरक्षण, वस्तीगृह, मुलांना बिनव्याजी कर्ज, शेतकऱ्यांना कर्ज माफी याबाबतीत शासणाने फसवले आहे, असा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून करीत स्वतःचे मुंडन करून घेत ग्रामस्थांनी सरकारचा निषेध केला आहे.यावेळी गावातील मराठा समाजाचे युवक विनायक कांडेकर, पप्पू कांडेकर, ऋषिकेश निरगुडे, पंकज ठिळे, गोकुळ कांडेकर,सोमनाथ कांडेकर,प्रवीण अनवट,अक्षय वळवे, निलेश वळवे, रुक्षिकेश अनवट,गणेश अनवट,आकाश वळवे, पवन वळवे यांनी मुंडन करून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यांदोलनाच्या वेळी नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व तुषार जगताप यांच्यासह राजू देसले, गणेश कदम, आदि उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आंदोलनात संयम, शांततेच आवाहन करताना कोणीही हिंसक पद्धतीने अथवा स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून आंदोलना करू नये आसे आवाहन मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केले आहे.

Web Title:  Mundane by the protesters of the gross Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.