मुंढे यांनी निवासस्थान न सोडल्याने गमेंची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:50 AM2019-01-10T01:50:50+5:302019-01-10T01:51:05+5:30
नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासकीय निवासस्थान न सोडल्याने आता विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे त्रस्त झाले असून, त्यांनी अखेरीस शासनाकडे धाव घेतली आहे.
नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासकीय निवासस्थान न सोडल्याने आता विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे त्रस्त झाले असून, त्यांनी अखेरीस शासनाकडे धाव घेतली आहे. नाशिकमध्ये यापूर्वी टी. सी. बेंजामीन आणि विद्याधर कानडे यांची बदली झाल्यानंतर त्यांनादेखील काही महिने नाशिकमध्ये कुटुंब ठेवावे लागणार होते. परंतु त्यांनी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पर्यायी निवासस्थाने घेतली होती त्यालाही यानिमित्ताने महापालिकात वर्तुळात उजाळा दिला जात आहे.
तुकाराम मुंढे यांची बदली महिनाभराचा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे त्यांनी निवासस्थान सोडलेले नाही. नूतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा मुक्काम नवश्या गणपती जवळील सदनिकेत आहे. परंतु महापालिकेचे आयुक्त म्हणून कामकाज करताना त्यांना ही सदनिका अपुरी पडत आहे.