मुंढे साहेब गो बॅक...हॉकर्स, टपरीधारकांचा ‘आक्रोश मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:42 PM2018-03-03T14:42:54+5:302018-03-03T14:42:54+5:30

महापालिकेवर धडक : एकतर्फी हॉकर्स झोन रद्दची मागणी

Mundhe Saheb Go Back ... hokers, trappers 'Arochha Morcha' | मुंढे साहेब गो बॅक...हॉकर्स, टपरीधारकांचा ‘आक्रोश मोर्चा’

मुंढे साहेब गो बॅक...हॉकर्स, टपरीधारकांचा ‘आक्रोश मोर्चा’

googlenewsNext
ठळक मुद्दे भालेकर मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हॉकर्स-टपरीधारक सहभागी झाले होतेभाजपा नेते सुनील बागुल यांनी तिखट शब्दांत आयुक्तांचा समाचार घेतला

नाशिक : महापालिकेने शहरात रस्त्यांवर व्यवसाय करणा-या विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने महापालिकेवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी, आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात एकतर्फी करण्यात आलेले हॉकर्स झोन रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने भाजपाचे नेते सुनील बागुल, शिवसेनेचे शिवाजी भोर, पिपल्स रिपाइंचे शशिकांत उन्हवणे, भाजपाचे नवनाथ ढगे, सय्यद युनूस, श्रमिक हॉकर्स सेनेचे संदीप जाधव, अजय बागुल व हॉकर्स युनियनच्या पुष्पा वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या राजीव गांधी भवनवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. भालेकर मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने हॉकर्स-टपरीधारक सहभागी झाले होते. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कृती समितीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, महापालिकेने कुठलेही नियोजन न करता हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. मात्र, या हॉकर्स झोनला सर्वांचा तीव्र विरोध आहे. २३ जून २०१७ रोजी महापौरांकडे झालेल्या बैठकीत फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून विभागीय अधिकाºयांनी झोनबाबत विचारविनिमय करावा, असे ठरले असतानाही, एकतर्फी झोन तयार करून फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. दबाव तंत्राचा अवलंब करून पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली जात आहे. शहरातील फेरीवाल्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण विरोधी मोहीम थांबवावी, शहर फेरीवाला समिती गठीत करावी तसेच घरपट्टीत केलेली दरवाढ रद्द करावी आदी मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
मुंढेविरोधी घोेषणाबाजी
मोर्चात नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याशिवाय, ‘मुंढे साहेब, गो बॅक...’चे फलकही लक्ष वेधून घेत होते. महापालिकेसमोर झालेल्या जाहीर सभेत वक्त्यांनी मुंढे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. भाजपा नेते सुनील बागुल यांनी तिखट शब्दांत आयुक्तांचा समाचार घेतला. दहा वर्षांत ज्या माणसाच्या तेरा वेळा बदल्या होतात, याचा अर्थ आयुक्त सक्षम नसल्याची टीकाही बागुल यांनी केली.
 

Web Title: Mundhe Saheb Go Back ... hokers, trappers 'Arochha Morcha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.