पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:40 AM2018-06-14T00:40:31+5:302018-06-14T00:40:31+5:30

शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी महापालिकेचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, स्वच्छतेबरोबरच विविध भागात रुग्णांचा सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

 Municipal alert on rainy days | पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा सतर्क

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा सतर्क

Next

नाशिक : शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी महापालिकेचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, स्वच्छतेबरोबरच विविध भागात रुग्णांचा सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.पावसाळ्यात जलजन्य आजार होतात. विशेषत: पावसामुळे डेंग्यूसारखे आजार डोके वर काढत असल्याने मनपाच्या वतीने पेस्ट कंट्रोल फवारणीस वेग देण्यात आला असून, जीपीआरएसद्वारे कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. याशिवाय सिडकोत टायर आणि अन्य साधने जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू यांसह कावीळ आदी आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर शहरी आरोग्य सेवा केंद्रांना आपापल्या परिसरात दर आठवड्यास सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले
आहेत.ज्याठिकाणी रुग्ण आढळेल त्याठिकाणी तातडीने रक्ताचे नमुने तपासणे तसेच अन्य रुग्णांचा शोध घेऊन उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लू तसेच जलजन्य आजार टाळण्यासाठी जनप्रबोधनही सुरू करण्यात आले आहे, असे माहिती आरोग्याधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी दिली.
सिडकोत तपासणी
सिडकोतील साईबाबानगर येथे तापाचे रुग्ण आढळल्याने त्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्याठिकाणी तातडीने जाऊन संबंधितांवर उपचार केले. या तापसदृश आजार असलेल्या रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.

Web Title:  Municipal alert on rainy days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.