आज महापालिकेचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:29 AM2018-03-20T01:29:37+5:302018-03-20T01:29:37+5:30

महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकांसह नाशिककरांचीही उत्सुकता असून, गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात उमटण्याची शक्यता आहे.

Municipal budget today | आज महापालिकेचे अंदाजपत्रक

आज महापालिकेचे अंदाजपत्रक

Next

नाशिक : महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकांसह नाशिककरांचीही उत्सुकता असून, गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब अंदाज-पत्रकात उमटण्याची शक्यता आहे.  महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केले होते आणि २८ फेबु्रवारी अखेर ते सादर होण्याची तयारीही सुरू होती. मात्र, ७ फेबु्रवारीला अभिषेक कृष्ण यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर पदभार स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रकाची नव्याने जुळणी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, अभिषेक कृष्ण यांनी १४५१ कोटी रुपयांचे सुधारित आणि १४७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणार होते. त्यात त्यांनी घरपट्टी १४ टक्के, तर पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली होती. याशिवाय सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी फारसा वाव राहणार नसल्याचे सूतोवाच करत प्रलंबित कामांनाच गती देण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक नव्याने सादर करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या महिनाभरापासून त्याची तयारी केली. महिनाभरात आपल्या ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत मुंढे यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. उत्पन्नाच्या जमा बाजूनुसारच विकासकामे हाती घेण्याची भूमिका मुंढे यांनी घेतली आणि त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील नगरसेवक निधीसह २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांनाही कात्री लावली. त्यामुळे येत्या अंदाजपत्रकात मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’चे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. मुंढे यांच्या अंदाजपत्रकात नेमके दडलेय काय, याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२०) होणाºया महासभेकडे लक्ष लागून राहिले आहे.
महासभेच्या भूमिकेकडे लक्ष
अंदाजपत्रक स्थायी समितीवर सादर न करता आयुक्तांनी ते थेट महासभेवर सादर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२०) होणाºया महासभेत सत्ताधारी भाजपाकडून अंदाजपत्रक पुन्हा स्थायीवर पाठविले जाते की, महासभेवरच त्याला अंतिम रूप देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्यस्थितीत स्थायी समिती गठित झालेली असल्याने स्थायी समितीच्याही भूमिकेकडे लक्ष केंद्रित झाले आहे.
शहर बससेवेसाठी तरतूद
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च २०१९ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत शहर बससेवा महापालिका ताब्यात घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अंदाजपत्रकात बससेवेसाठीही मोठी तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, अन्य विकासाच्या प्रकल्पांना कात्री लागण्याची चिन्हे आहेत. माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शहर बससेवेसाठी ७० कोटी रुपयांची तरतूद केली होती.

Web Title: Municipal budget today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.