मनपा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 01:30 AM2022-02-03T01:30:49+5:302022-02-03T01:32:00+5:30
निवडणुकींमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प जानेवारीतच सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी अखेरीस फेब्रुवारी महिना उजाडला असून येत्या सोमवारी (दि. ७) आयुक्त कैलास जाधव हे स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
नाशिक : निवडणुकींमुळे महापालिकेचा अर्थसंकल्प जानेवारीतच सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी अखेरीस फेब्रुवारी महिना उजाडला असून येत्या सोमवारी (दि. ७) आयुक्त कैलास जाधव हे स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नाशिक महापालिकेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून जानेवारीत सादर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, वेळेत लेखा विभागाकडे माहिती संकलित न झाल्याने अंदाजपत्रकाचा मुहूर्त हुकला. आता फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थात, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे करवाढ केली तरी निवडणुकांमुळे स्थायी समिती अथवा महासभा ती स्वीकारण्याची शक्यता नाही. सत्तारूढ भाजपचा चालू पंचवार्षिक निवडणुकीतील हा अखेरचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच स्थायी समिती पाठोपाठ महासभादेखील मान्यता देण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नव्या घोषणांचा बार उडण्याची शक्यता आहे.