मनपा सिडको विभाग : एकाच अधिकाºयाकडे अन्य जबाबदारीचा बोजा उद्यान निरीक्षकावर चार विभागांचा अतिरिक्त भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:57 AM2017-12-16T00:57:47+5:302017-12-16T00:58:47+5:30

महापालिकेच्या कामकाजात व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाºया उद्यान विभागाचे सिडकोचे प्रभारी उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांच्यावर सिडको बरोबरच सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम आदी पाच विभागांच्या प्रभारी उद्यान निरीक्षकाचा पदभार देण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.

Municipal CIDCO Department: The additional responsibility of the four officers in the garden inspector for other responsibility | मनपा सिडको विभाग : एकाच अधिकाºयाकडे अन्य जबाबदारीचा बोजा उद्यान निरीक्षकावर चार विभागांचा अतिरिक्त भार

मनपा सिडको विभाग : एकाच अधिकाºयाकडे अन्य जबाबदारीचा बोजा उद्यान निरीक्षकावर चार विभागांचा अतिरिक्त भार

Next
ठळक मुद्दे५० उद्याने देखभालीसाठी देण्यात आली वाढलेले गाजरगवत, धोकादायक मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या

सिडको : महापालिकेच्या कामकाजात व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाºया उद्यान विभागाचे सिडकोचे प्रभारी उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांच्यावर सिडको बरोबरच सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम आदी पाच विभागांच्या प्रभारी उद्यान निरीक्षकाचा पदभार देण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे.
सिडकोतील सहा प्रभागांमध्ये महापालिकेचे एकूण ७२ उद्यान आहेत. यापैकी ५० उद्याने देखभालीसाठी देण्यात आली असून, २२ उद्याने मनपाच्या ताब्यात आहेत. या उद्यानांच्या देखभालीची जबाबदारी प्रभारी उद्यान निरीक्षक राजेंद्र पांडे यांच्याकडे आहे. या उद्यानातील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामे या विभागातील कर्मचाºयांना करावी लागतात. यासाठी प्रत्येक प्रभागात साधारणत: चार कर्मचारी याप्रमाणे अकरा प्रभागांत मिळून ४४ कर्मचारी असणे गरजेचे असताना सध्या हे सर्व काम तीन महिला कर्मचाºयांसह अवघे १४ कर्मचारी करीत आहेत. सिडको भागात किमान पन्नास कर्मचारी गरजेचे असताना यासाठी अवघे १४ कर्मचारी हे काम करीत असल्याने त्यांच्याकडून हे काम पूर्ण होत नसल्याचे सिडकोतील उद्यानांची झालेली दयनीय अवस्था बघितल्यावर लक्षात येते. सिडकोतील बहुतांशी ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या असून, या फांद्यांमुळे पथदीप झाकले गेले असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरून अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. सिडको विभागाची अशी परिस्थिती असताना व उद्यान निरीक्षक याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नसताना त्यांच्यावर सिडकोबरोबरच सातपूर, नाशिकरोड, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या पाच विभागांच्या उद्यान निरीक्षकाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. सिडकोचाच भार सांभाळताना पांडे यांच्या नाकीनव येत असताना इतर चार विभागांचा अतिरिक्त भारदेखील त्यांच्यावर देण्यात आल्याने सिडकोबरोबर इतर भागातील उद्यानांचीदेखील दयनीय अवस्था झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Web Title: Municipal CIDCO Department: The additional responsibility of the four officers in the garden inspector for other responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.