मनपा आयुक्त बोर्डेंनी घेतला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:18 PM2018-12-27T18:18:12+5:302018-12-27T18:18:48+5:30
शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. महापौर रशीद शेख यांनी त्यांचे स्वागत केले.
मालेगाव : शासनाने महापालिकेच्या आयुक्तपदी किशोर बोर्डे यांची नियुक्ती केली आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी मनपा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे. महापौर रशीद शेख यांनी त्यांचे स्वागत केले.
संगिता धायगुडे यांची बदली झाल्यानंतर नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बोर्डे यांची मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली. गुरुवारी त्यांनी महापालिकेच्या सभागृहात मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. शहर स्वच्छता, विकासकामे, रखडलेली निविदा प्रक्रिया, नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्यक्रम देणार असल्याचे बोर्डे यांनी सांगितले. महापौर रशीद शेख यांनी आचारसंहितेपूर्वी कामे मार्गी लावावीत अशी सूचना आयुक्तांना केली आहे.