मनपा आयुक्तांनी केली फाळके स्मारकाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:42 PM2020-09-30T22:42:36+5:302020-10-01T01:12:40+5:30
सिडको : फाळके स्मारक ,बौद्ध स्मारक व सेंट्रल पार्क परिसराची मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी विविध कामांचे निर्देश विभागांना देण्यात आले.
सिडको : फाळके स्मारक ,बौद्ध स्मारक व सेंट्रल पार्क परिसराची मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी विविध कामांचे निर्देश विभागांना देण्यात आले.
नाशिक महापालिकेच्या फाळके स्मारक, बौद्ध स्मारक येथे आयुक्त कैलास जाधव यांनी बुधवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी बौद्ध स्मारक, बुद्ध विहार, प्रदर्शन हॉल,परिसरातील संगीत कारंजे, मिनी थिएटर येथील उद्यान, कार्यक्रमासाठी बनविण्यात आलेले छोटेखानी व्यासपीठ, दादासाहेब फाळके हॉल, डॉक्युमेंटरी हॉल, वॉटर पार्क, पार्किंग व परिसराला भेट दिली. तसेच त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. त्या ठिकाणी स्वच्छता करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या तसेच भविष्यात यामध्ये विकसीत करण्याच्या दृष्टीने शहर अभियंता संजय घुगे, उपायुक्त मनोज घोडे- पाटील,शिवाजी आमले यांच्याकडून माहिती घेऊन चर्चा केली.
सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या कामाची पाहणी करून सुरु असलेल्या कामकाजाबद्दल माहिती घेण्यात आली. त्या ठिकाणी सुरू असलेले संरक्षक भिंतीचे काम, प्रवेशद्वार आदींची पाहणी केली. तसेच भविष्यातील योजना व कामकाजाची रूपरेषा याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथील पाहणी करण्यात आली.
या पाहणीच्या वेळी अधीक्षक अभियंता एस एम चव्हाणके, कार्यकारी अभियंता देवेंद्र वनमाळी, आर एस पाटील, विभागीय अधिकारी मयूर पाटील,राजू आहेर आदी उपास्थित होते