मनपा आयुक्तांचे ‘हंड्रेड डेज’ मिशन

By admin | Published: October 30, 2016 01:13 AM2016-10-30T01:13:01+5:302016-10-30T01:15:29+5:30

मनपा आयुक्तांचे ‘हंड्रेड डेज’ मिशन

Municipal Commissioner's 'Hand Days' Mission | मनपा आयुक्तांचे ‘हंड्रेड डेज’ मिशन

मनपा आयुक्तांचे ‘हंड्रेड डेज’ मिशन

Next

नाशिक : पहिल्या शंभर दिवसांत आपण महापालिकेतील काही प्रलंबित प्रकल्पांना चालना दिली आता पुढील शंभर दिवसांत या प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  डॉ. प्रवीण गेडाम यांची बदली झाल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे ७ जुलै २०१६ रोजी हाती घेतली होती. सूत्रे स्वीकारल्यानंतर कृष्ण यांनी त्याचवेळी प्रत्येक प्रश्नाला उत्तर असल्याचे सांगत रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. यावेळी कृष्ण यांनी वर्षभराचे नियोजन करून त्यानुसार समन्वयातून कामाला प्राधान्य देण्याचेही सूतोवाच केले होते. त्यानुसार, आयुक्तांनी आपल्या कारकीर्दीतील पहिल्या शंभर दिवसांत घंटागाडीचा ठेका, उद्यान देखभालीचे खासगीकरण, खतप्रकल्पाचे खासगीकरण, मालमत्ता सर्वेक्षण, नगररचना विभागामार्फत आॅनलाइन बांधकाम परवानग्यांसाठी आॅटो डीसीआर प्रणाली, वाहनतळाचा प्रश्न आदि रखडलेल्या प्रकल्पांना हात घालत त्यांना चालना देण्याचा प्रयत्न केला. घंटागाडीच्या ठेक्याचा प्रश्न मार्गी लागल्याने आता दिवाळीनंतर शहरातील रस्त्यांवर नवीन घंटागाड्या दिसणार आहेत. खतप्रकल्पाचा खासगीकरणाचाही प्रश्न सुटल्याने हरित लवादाने बांधकाम परवानग्यांबाबत लादलेल्या अटी-शर्ती शिथिल होण्यास मदत होणार आहे.  आॅनलाइन बांधकाम परवानग्या व अग्निशमनचे ना हरकत दाखले उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रणाली तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्या १०० दिवसांत या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना चालना मिळाल्याने आता पुढील शंभर दिवस हे या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीचे राहणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यामुळे आयुक्तांचे आता ‘हंड्रेड डेज’ मिशन हे अमंलबजावणीचे असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal Commissioner's 'Hand Days' Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.