महापालिका : चौकशी पूर्ण; संबंधित चौघांनाही बजावल्या नोटिसा अधिकाºयांवर दोषारोप सिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:20 AM2018-03-09T01:20:35+5:302018-03-09T01:20:35+5:30
नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फेºयात अडकलेल्या चौघा अधिकाºयांवरील दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
नाशिक : महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फेºयात अडकलेल्या चौघा अधिकाºयांवरील दोषारोप सिद्ध झाले असून, चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. त्यामुळे चौघा अधिकाºयांवर गंडांतर येऊ घातले आहे.
महापालिकेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती. या अकरा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एकच निवृत्त अधिकारी नियुक्त केलेला होता. तुकाराम मुंढे यांनी दि. ८ फेबु्रवारीला आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनात साफसफाई मोहीम सुरू केली. काही अधिकाºयांचे खातेपालट केले. त्यात मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितानाच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चौकशांचा महिनाभराच्या आत निपटारा करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून चौकशांच्या फायलींवर अभ्यास सुरू होता. त्यात निलंबित उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील, निवृत्त अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन आणि मायको दवाखान्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. चौकशी अधिकाºयांनी चौघाही अधिकाºयांना तीन दिवसांपूर्वीच अंतिम नोटीस बजावली आहे. दहा दिवसांत त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडायचे आहे. त्यानंतर आयुक्त त्यावर आपला निर्णय घेतील. आयुक्तांकडून संबंधितांना सुनावण्यात येणाºया शास्तीचा प्रस्ताव महासभेपुढे जाणार आहे. अशावेळी दोषारोप सिद्ध झालेल्या अधिकाºयांबाबत महासभेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. चौघा अधिकाºयांमध्ये अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांची निवृत्ती काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारला त्याचदिवशी अनिल महाजन हे गणवेशात न आल्याने मुंढे यांनी त्यांना दणका दिला होता. त्यामुळे महाजन यांच्याबाबतीत होणाºया निर्णयाकडेही लक्ष लागून असणार आहे.