महापालिका ठेकेदारांची की नागरिकांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:18 AM2019-09-01T00:18:24+5:302019-09-01T00:18:40+5:30

पूर्व प्रभागात नगरसेवकांनी नागरिकांची सांगितलेली कामे अधिकारी करीत नसतील तर प्रभाग सभा बंद करा, अशी मागणी करून प्रभाग समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले.

 Of municipal contractors or citizens | महापालिका ठेकेदारांची की नागरिकांची

महापालिका ठेकेदारांची की नागरिकांची

googlenewsNext

इंदिरानगर : पूर्व प्रभागात नगरसेवकांनी नागरिकांची सांगितलेली कामे अधिकारी करीत नसतील तर प्रभाग सभा बंद करा, अशी मागणी करून प्रभाग समितीच्या सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
पूर्व प्रभाग समितीच्या सभापती सुमन भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सभा झाली. सभा सुरू होताच, मागील सभेत मांडलेल्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. प्रभागातील कामे सांगूनही होत नसेल तर सभा बंद करा, अशी मागणी समीना मेमन यांनी केली. आम्ही नागरिकांच्या समस्या पोटतिडकीने माडतो तरीही कामे होत नसतील तर सभेला येऊन उपयोग काय? असा सवाल करून मनपा ठेकेदारांसाठी आहे की, नागरिकांसाठी याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली तसेच प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापि पाणीप्रश्न सुटला नाही, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियोजनाअभावी कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या सभेत येथील विभागीय कार्यालयाचा इमारतीचा काही भाग ढासळल्याने दोन सदस्यांनी सभात्याग केला होता तरीही आज पुन्हा त्याच ठिकाणी सभा घेण्यात आली अशा इमारतीतच श्रींची स्थापना कशी करतात, असा प्रश्न अ‍ॅड. श्यामला दीक्षित व अ‍ॅड. अजिंक्य साने यांनी केला.
सूचितानगर परिसरात अद्यापपर्यंत स्वच्छता कर्मचारी फिरकला नसल्याची तक्रार दीक्षित यांनी केली. वडाळागाव व इंदिरानगर परिसरात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार सुप्रिया खोडे यांनी केली. डासांचा प्रादुर्भाव वाढला तरीही मलेरिया विभागाकडून धूर फवारणी होत नाही, तक्रार केली तरच फवारणी होत असल्याची तक्रार सुषमा पगारे यांनी केली. जलशुद्धीकरण केंद्रात कामे होतात की नाही, असा प्रश्न विचारून रूपाली निकुळे यांनी प्रभागात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली.
सर्वांना यावेळी सुमारे एक कोटी साठ लाख रुपये निधीतून विविध विकासकामांना मंजुरी दिली.
...तर सभा घेणे बंद करा
यावेळी सर्व सदस्यांनी नागरिकांची कामे होत नसेल तर सभा घेणे बंद करा, असे म्हणत प्रशासनाला धारेवर धरले. उपमहापौर प्रथमेश गिते व सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना सदस्यांनी तातडीने कामे करण्याच्या सूचना केल्या.

Web Title:  Of municipal contractors or citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.