महापालिका : २७ कनिष्ठ, शाखा अभियंत्यांच्या बदल्या ‘नगररचना’त नव्या चेहऱ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:22 AM2018-05-27T01:22:29+5:302018-05-27T01:22:29+5:30
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत:कडे असलेल्या नगररचना विभागाच्या सक्षमीकरणावर भर दिला.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत:कडे असलेल्या नगररचना विभागाच्या सक्षमीकरणावर भर दिला असून, या विभागात वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या आणि कामात दिरंगाई करणाºयांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागेवर आपल्या कामकाजात प्रगती दाखविणाºया अभियंत्यांच्या नेमणुका केल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी २२ अभियंत्यांच्या बदल्यांनंतर २७ कनिष्ठ आणि शाखा अभियंत्यांच्याही बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
सध्या शासनाच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाच्या धोरणानुसार, कंपाउंडिंगचे प्रस्ताव सादर करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात गर्दी होत आहे. याशिवाय, आॅटो डिसीआरप्रणालीनुसार काम सुरू झालेले आहे. नगररचना विभाग हा आयुक्तांकडे असून, या विभागात साफसफाई करण्यासाठी आता बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवारी कार्यकारी अभियंत्यांसह काही उपअभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या.
काही अभियंत्यांकडे देण्यात आलेली जबाबदारी वेगळी आणि प्रत्यक्ष काम वेगळे, अशी स्थिती आढळून आल्याने आयुक्तांनी भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी गेल्या तीन-साडेतीन महिन्यांत केलेल्या अवलोकनावरून कार्यक्षम आणि कामकाजात प्रगती दाखविणाºया अभियंत्यांना नगररचना विभागात संधी दिली असून, त्यात अनेक नव्या चेहºयांचा समावेश आहे. यापूर्वी नगररचना विभागात बदली करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘अर्थकारण’ चालायचे परंतु, कुठलेही प्रयत्न न करता नगररचना विभागात पदस्थापना झाल्याने अनेक अभियंत्यांना हर्षवायू झाला आहे. दरम्यान, महापालिकेतील २७ सहाय्यक, कनिष्ठ व शाखा अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात संजय गावीत (बांधकाम, सातपूर) नरेंद्र शिंदे (पाणीपुरवठा, सातपूर) संजय मोडक (घरपट्टी, मुख्यालय) जितेंद्रसिंह चव्हाण (पाणीपुुरवठा, सिडको), सुशील शिंदे (पाणीपुरवठा, नाशिक पूर्व), गोकुळदास मिरगणे (पाणीपुरवठा, पंचवटी), जे. एच. हांडगे (घरपट्टी, मुख्यालय), डी. आर. हांडोरे (नगररचना, मुख्यालय), नंदकुमार शिरसाठ (बांधकाम, नाशिकरोड), संजय खुळे (पाणीपुरवठा, सातपूर), सुरेश पाटील (मलनि:स्सारण, नाशिकरोड), एच. के.पठे (नगररचना, मुख्यालय), संतोष जोपळे (मलनि:स्सारण, पश्चिम), रुपेंद्रकुमार चव्हाण (पाणीपुरवठा, पंचवटी), एच. टी. नांदुर्डीकर (नगररचना, मुख्यालय), विशाल गरुड (नगररचना, मुख्यालय), रविंद्र पाटील (पाणीपुरवठा, नाशिक पूर्व), नवनीत भामरे (बांधकाम, पश्चिम), जयवंत राऊत (नगररचना, मुख्यालय), गोकुळ पगारे (मलनि:स्सारण, पंचवटी), दत्तात्रेय शिंगाडे (मलनि:स्सारण, सिडको), आर. बी. सोनवणे (घरपट्टी, मुख्यालय), आर. आर. ठाकूर (घरपट्टी, मुख्यालय), दिनेश सोनार (बांधकाम, पंचवटी), एस. पी. पाटील (नगररचना, मुख्यालय), सुभाष अहेर (पाणीपुरवठा, नाशिकरोड) आणि उदय जाधव (पाणीपुरवठा,सिडको) यांची बदली करण्यात आली आहे.