महापालिकेकडून पुन्हा महिला रोजगार प्रशिक्षणाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 12:15 AM2020-05-28T00:15:52+5:302020-05-28T00:17:06+5:30
महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षीच महिला प्रशिक्षणात होणारे गोंधळ आणि संशयास्पद प्रकार बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. मात्र, आता पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाने सुमारे ११०० महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एक कोटी ८१ लाख रुपयांचा हा प्रस्ताव शुक्रवारी (दि.२९) व्हिडीओ कॉफन्रसिंगद्वारे होत असलेल्या महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
नाशिक : महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षीच महिला प्रशिक्षणात होणारे गोंधळ आणि संशयास्पद प्रकार बघितल्यानंतर दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रशिक्षणाची योजना गुंडाळली होती. मात्र, आता पुन्हा ती सुरू करण्यात येणार आहे. प्रशासनाने सुमारे ११०० महिलांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. एक कोटी ८१ लाख रुपयांचा हा प्रस्ताव शुक्रवारी (दि.२९) व्हिडीओ कॉफन्रसिंगद्वारे होत असलेल्या महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मनपाच्या महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. सुरुवातीची काही वर्षे चांगली गेल्यानंतर प्रशिक्षण योजनादेखील चराऊ कुरण बनले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी हा विषय बाजूला ठेवला. मात्र, महिला व बाल कल्याण विभागाचा हा निधी अन्य विभागांकडून विशेषत: बांधकाम विभागाकडून पळविला जात असल्याची तक्रार सदस्यांनी महासभेत केली होती. महिला व बाल कल्याण समितीचा निधी याच विभागासाठी खर्च करावा अशी त्यांनी आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर आता नव्या आर्थिक वर्षात विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महिला प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडला आहे.
अर्थात, यापूर्वीचे घोटाळ्यांचे आरोप बघता प्रशासनाने त्यात बदल केले असून, शासन निकषाप्रमाणेच मान्यताप्राप्त नोंदणीकृत संस्थेमार्फतच प्रशिक्षण दिले जाणार आहे.