महापालिकेची शिंदे गटावर मेहेरबानी; माजी नगरसेवकांच्या प्रभागात ५२ कामे, २६ कोटींची मंजुरी
By श्याम बागुल | Published: August 10, 2023 08:06 PM2023-08-10T20:06:37+5:302023-08-10T20:15:16+5:30
अगोदर प्रवीण तिदमे या नगरसेवकाने शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
नाशिक : शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेल्या शिवसेनेच्या अकरा माजी नगरसेवकांच्या मतदार संघातील मतदारांना खूश करण्यासाठी शिंदे यांनी दिलेल्या ‘विकासाचे’ आश्वासन मार्गी लागले असून, गुरुवारी (दि. १०) महापालिकेच्या महासभेत अकरा नगरसेवकांच्या प्रभागात सुमारे २६ कोटी रूपये खर्चाच्या ५२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाच्या नगरसेवकांना त्यातून ‘बूस्टर’ मिळणार असले, तरी ठाकरे गटाने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जनतेशी भेदभाव केल्याचे म्हटले आहे. नाशिक महापालिकेत एकसंघ शिवसेनेचे ३५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर नाशिकच्या शिवसेनेतही बंडखोरी झाली.
अगोदर प्रवीण तिदमे या नगरसेवकाने शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र ऑगस्ट महिन्यात अजय बोरस्ते, राजू लवटे यांच्यासह अकरा माजी नगरसेवकांनी मध्यरात्री गुपचूप मुंबई गाठून पहाटे पहाटे शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांना आमिषे दाखविण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता, तर काही नगरसेवकांना प्रभागात कामासाठी निधी देण्याचे आश्वासन देऊन पक्षातून फोडल्याचीही चर्चा रंगली होती. कालांतराने ही चर्चा खरी ठरली. शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात सत्तेवर असलेल्या तत्कालीन भाजपच्या महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी अन्याय केल्याने विकासापासून वंचित राहावे लागल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या माजी नगरसेवकांना प्रत्येकाच्या प्रभागात दोन कोटी रूपये याप्रमाणे २६ कोटी रुपयांचा विशेष निधी नगरविकास खात्याकडून मंजूर केला