वैद्यकीय भरतीसाठी महापालिकेत झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 01:31 AM2021-07-24T01:31:40+5:302021-07-24T01:32:02+5:30

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली असून त्यासाठी राजीव गांधी भवनात एकच शुक्रवारी (दि.२३) एकच झुंबड उडाली.

Municipal Corporation for Medical Recruitment | वैद्यकीय भरतीसाठी महापालिकेत झुंबड

वैद्यकीय भरतीसाठी महापालिकेत झुंबड

Next
ठळक मुद्देतिसऱ्या लाटेची तयारी: आरोग्य नियमांचे उल्लंघन

नाशिक- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून नाशिक महापालिकेच्या वतीने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली असून त्यासाठी राजीव गांधी भवनात एकच शुक्रवारी (दि.२३) एकच झुंबड उडाली. महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर दोन रांगा लाऊन महीला उमेदवारांना उभे करण्यात आले होते मात्र गर्दीच्या नियोजनासाठी सुरक्षा रक्षकांची मदत घ्यावी लागली. त्यानंतरही या रांगेत आणि अन्यत्र गर्दीमुळे आरोग्य नियमांचे उल्लंघन होत होते.

महापालिकेच्या वतीने ४० वैद्यकीय अधिकारी, २८ एमडी डॉक्टर्स, ५० स्टाफ नर्स २०० एएनएम, आणि दहा तंत्रज्ञ अशी पदे भरण्यात येाणार आहे. त्यासाठी वॉक इन इंटरव्ह्यू सुरू आहेत. स्टाफ नर्सच्या ५० जांगासाठी मुलाखती घेण्यासाठी उमेदवार बाेलवण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १२०० इच्छुकां उमेदवारांनी हजेरी लावल्याने महापालिकेत प्रचंड गर्दी झाली हाेती. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त पॅनलव्दारे मुलाखती घेण्यात येत असल्याने पहिल्या मजल्यावर रांगा लागल्या होत्या. तसेच अन्य ठिकाणीही उमेदवार घुटमळत होते. सुरक्षा रक्षकांनी गर्दीचे नियोजन केले असले तरी उमेदवारांची संख्या खूप असल्याने सुरक्षीत अंतराच्या नियमांचा फज्जा उडाला.

 

Web Title: Municipal Corporation for Medical Recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.