गणेशोत्सवाच्या नावाखाली महापालिकेचे चांगभलं !

By श्याम बागुल | Published: September 4, 2018 05:33 PM2018-09-04T17:33:55+5:302018-09-04T17:37:12+5:30

यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केलेला बरा अशी भावना व्यक्त केली जात

Municipal corporation named after Ganeshotsav! | गणेशोत्सवाच्या नावाखाली महापालिकेचे चांगभलं !

गणेशोत्सवाच्या नावाखाली महापालिकेचे चांगभलं !

Next
ठळक मुद्देपैशांची आकारणी : दात कोरून पोट भरण्याचा प्रकारपरवानगीसाठी ७५० रुपये व एका स्वागत कमानीसाठी ७५० रुपये शुल्क आकारणी

नाशिक : देणगी, वर्गणी व प्रसंगी खिशातून दरवर्षी सार्वजनिक गणेश उत्सवासाठी पै न पै गोळा करणाऱ्या मंडळांपुढे यंदा महागाईचे सावट असतानाच ते कमी की काय म्हणून नाशिक महापालिकेनेदेखील गणेश मंडळांना विविध परवानग्या देण्याच्या नावाने पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मंडप उभारणी, रस्त्याचे खोदकामापासून ते गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लागणाºया लेखी अनुमतीसाठीही मोठ्या प्रमाणावर कर आकारल्यामुळे कोट्यवधीचे अंदाजपत्रक तयार करणाºया महापालिकेचे धोरण म्हणजे ‘दात कोरून पोट भरण्याचा प्रकार’ असल्याचे मानले जात आहे.
यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केलेला बरा अशी भावना व्यक्त केली जात आहे. एकीकडे उत्सवाची तयारी व दुसरीकडे परवानग्यांसाठी गणेशभक्तांना धावपळ करावी लागत असून, गणेशभक्तांच्या याच उत्साहाचा महापालिकेने आर्थिक लाभ उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न चालविला आहे. मुळातच रस्त्यावर मंडप उभारण्यास अनुमती देतांना खळखळ करणा-या महापालिकेने मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ७५० रुपये व एका स्वागत कमानीसाठी ७५० रुपये शुल्क आकारणी केली आहे. त्यातही स्वागत कमान असो वा मंडपाची उभारणी असो त्यासाठी गणेशभक्तांना रस्ता खोदण्यास मनाई करण्यात आली असून, वाळूच्या ड्रममध्ये लाकडी बांबू टाकूनच कमान उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी जर रस्ता खोदल्यास तर त्यास नियमानुसार हजारो रुपयांचा दंड करण्याची तयारीही महापालिकेने चालविली आहे. गणेशोत्सवात व्यावसायिक प्रतिष्ठाने, वस्तू उत्पादित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या जातात. विशेष करून गणेशोत्सव मंडळांच्या स्वागत कमानींवरच जाहिरातींचे फलक झळकतात, अशा जाहिरातबाजीलाही महापालिकेने आक्षेप घेतला असून, कमानीवर अथवा मंडपाच्या आवारात वाणिज्य जाहिरात करावयाची असल्यास त्यासाठी वेगळी अनुमती व विहित शुल्क भरण्याचा सल्ला गणेश मंडळांना देण्यात आला आहे.
महापालिकेने गणेशोत्सवाला पैसे कमविण्याचे साधन ठरवून आकारणी करण्यात येणाºया प्रत्येक परवानगीसाठी शुल्क आकारण्याबरोबरच सदरच्या शुल्कावर वस्तू व सेवाकराची (जीएसटी) वेगळी आकारणी करण्याचे ठरविले आहे. गणेशोत्सवासाठी करण्यात येणाºया विद्युत रोषणाईसाठी महावितरणकडून वीजजोडणी घेण्यासाठी पैसे मोजण्याबरोबरच महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे त्यासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्रासाठीदेखील वेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे, त्यामुळे यंदा महापालिकेने गणरायांनाच कराच्या विळख्यात जखडल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.

Web Title: Municipal corporation named after Ganeshotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.