सातपूर मंडई परिसरातील अतिक्रमण हटविले महापालिकेची कारवाई : मेनरोडने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:32 AM2017-12-22T01:32:41+5:302017-12-22T01:33:42+5:30
नाशिक : महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून सातपूर गावातील मंडईबाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच मंडईतील व्यापाºयांचे पत्र्याचे शेड काढण्याची कारवाई पूर्ण केली.
नाशिक : महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून सातपूर गावातील मंडईबाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच मंडईतील व्यापाºयांचे पत्र्याचे शेड काढण्याची कारवाई पूर्ण केली. गेल्या अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने मेनरोड मोकळा झाला आहे. मोहिमेप्रसंगी विक्रेत्यांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या फौजफाट्यापुढे त्यांची मात्रा चालली नाही. सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई बाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटवून रस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची खूप दिवसांपासूनची मागणी होती तर मंडई बाहेरील विक्रे त्यांनी मंडईत स्थलांतरित व्हावे यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. मंडईच्या आतील आणि बाहेरील विक्रेत्यांमध्येही वाद होते. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी भाजी विक्रेत्यांची बैठक घेऊन सामोपचाराने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस बळाचा वापर करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला होता. मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार, गुरुवारी (दि.२१) सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मोहिमेला सुरूवात करण्यात आली. कमानीपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत टपºयांचे अतिक्र मण हटविण्यात आले. त्यापाठोपाठ मंडई बाहेरील भाजीपाला, फळे, कटलरी, मसाला विक्रेत्यांना हटविण्यात आले. यावेळी हॉकर्स युनियनच्या माध्यमातून विक्रेत्यांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून बघ्यांना पिटाळून लावले. याचवेळी मंडईतील व्यापाºयांनी दुकानाबाहेर उभारलेले पत्र्याचे शेड हटविण्यास सुरु वात केली. मंडईतील विक्रेत्यांचे अनधिकृत अतिक्रमणदेखील हटविण्यात आले. त्यानंतर मोहीम त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आली आणि मशिदीलगतच्या अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली.
विक्रेत्यांकडून घोषणाबाजी
मंडई बाहेरील अनधिकृत विक्रे त्यांना हटविण्याची कारवाई होत असताना ‘आम्हाला अगोदर जागा देऊन आमचे पुनर्वसन करावे, अशी जोरदार मागणी विक्रे त्यांनी विभागीय अधिकाºयांकडे केली. यावेळी विक्रे त्यांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. हॉकर्स युनियनच्या पुष्पा वानखेडे यांनी हॉकर्सचे नेते शांताराम चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मंडई बाहेरील अनधिकृत विक्रे त्यांना हटविण्यात आल्यानंतर रस्ता पूर्णपणे मोकळा झाला. विक्रे त्यांच्या विळख्यात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानेदेखील मोकळा श्वास घेतला.