नागरिकांच्या तक्रारींची महापालिकेकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:30+5:302021-05-22T04:14:30+5:30

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधील काही भागात नुकतेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. काही भाग अद्याप बाकी आहे. डांबरीकरणापूर्वी ...

Municipal Corporation takes care of citizens' complaints | नागरिकांच्या तक्रारींची महापालिकेकडून दखल

नागरिकांच्या तक्रारींची महापालिकेकडून दखल

Next

नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधील काही भागात नुकतेच डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले. काही भाग अद्याप बाकी आहे. डांबरीकरणापूर्वी व नंतरच्या कामाने भुयारी आणि पावसाळी गटारीचे चेंबर रस्त्याखाली दबलेले आहे. यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबून मोठी समस्या निर्माण होईल. याबाबत शिवसेना व सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, चारुशिला गायकवाड यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार करून आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊन महापालिकेच्या भुयारी गटार व बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त दौरा केला. यात कार्यकारी अभियंता नितीन वंजारी, उपअभियंता नितीन पाटील, अभय चोक्सी, उपअभियंता मोहम्मद काझी, विनायक गांगुर्डे, आर. ई. शिंदे यांचा समावेश होता. त्यांनी रुंगठा एम्पेरिया, रुंगठा होरायझन, कालिका पार्क, रामराज्य सोसायटी, जगताप नगर, मातोश्री चौक, राजीव गांधी उद्यान, मधुरा पार्क, सेजल क्लासिक, अनमोल व्हॅली, प्रियंका पार्क या भागात पाहणी केली. चेंबर मोकळे करण्याचे व दुरुस्त करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. पावसाळ्यात त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रेखा भालेराव, रवींद्र सोनजे, श्रीकांत नाईक, प्रभाकर खैरनार, मनोज पाटील, संजय टकले, बाळासाहेब दुसाने, मगन तलवार, मकरंद पुरेकर, संदीप महाजन, विनोद पोळ, आशिष खानापूरकर आदी उपस्थित होते.

(फोटो २१ एमएनसी) - पावसाळी गटारची पाहणी करताना नितीन वंजारी, नितीन पाटील, बाबासाहेब गायकवाड, अभय चोक्सी, उपअभियंता मोहम्मद काझी, विनायक गांगुर्डे आदी.

Web Title: Municipal Corporation takes care of citizens' complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.