महापालिका संगणकीकरणातून ५५ सेवा पुरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:09+5:302021-03-09T04:18:09+5:30
या सेवांमध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलची नोंदणी नूतनीकरण, जैविक कचरा विल्हेवाट नोंदणी, मलनिस्सारण कनेक्शन परवानगी, नळजोडणी, अग्निशमन नाहरकत दाखले, नवीन मिळकत ...
या सेवांमध्ये प्रामुख्याने हॉस्पिटलची नोंदणी नूतनीकरण, जैविक कचरा विल्हेवाट नोंदणी, मलनिस्सारण कनेक्शन परवानगी, नळजोडणी, अग्निशमन नाहरकत दाखले, नवीन मिळकत नोंदणी, थकबाकी दाखला, झोन दाखला, जाहिरात परवानगी, प्लम्बिग लायसन्स, झाडे कटिंग, जन्म-मृत्यू नोंदणीप्रणाली, विविध परवाने, विविध ना हरकत दाखले, परवानग्या इत्यादी तसेच मनपा संकेतस्थळ ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली, नाट्यगृह व फाळके स्मारक ऑनलाइन तिकीट विक्रीप्रणाली, पत्र व फाइल मॅनेजमेंट प्रणाली, स्थानिक संस्था कर संकलनप्रणाली तसेच सेवा हमी कायदा अंतर्गत येणाऱ्या विविध ऑनलाइन कार्यप्रणालीचा समावेश आहे. या सेवासुविधा पुरविण्यात येत असताना संकलित होणारा डेटा सुरक्षित ठेवणे तसेच ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना उपलब्ध होण्याकरिता डेटा सेंटरद्वारे क्लाऊडवर ॲप्लिकेशन होस्टिंग करून त्याद्वारे नागरिकांना सर्व ऑनलाइन सेवा सुलभरीत्या व विनाव्यत्यय प्राप्त करून देण्यात येणार आहेत. महानगरपालिका नागरिकांना देत असलेल्या सुविधा याबाबत महाराष्ट्र शासन माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी काही तज्ज्ञ सल्लागार संस्था तीन वर्षे कालावधीकरिता नियुक्त केलेल्या आहेत मे. एसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक ही संस्था नाशिक महानगरपालिकेचे कामकाज करीत असून, त्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने ही सेवा पुढेही अशीच चालू राहावी याकरिता महासभेने मंजुरी दिल्याचे महापौरांनी सांगितले. या सर्व सेवासुविधांचा व कार्यप्रणालीचा नागरिकांनी वापर करावा, असे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले आहे.