वयाने ज्येष्ठ तसेच शिक्षिकांना मनपा देणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:14 AM2021-04-16T04:14:16+5:302021-04-16T04:14:16+5:30

स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १६) महापालिकेत ही बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, शिक्षणाधिकारी ...

Municipal Corporation will provide relief to senior citizens as well as teachers | वयाने ज्येष्ठ तसेच शिक्षिकांना मनपा देणार दिलासा

वयाने ज्येष्ठ तसेच शिक्षिकांना मनपा देणार दिलासा

googlenewsNext

स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १६) महापालिकेत ही बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह अन्य अधिकारी तसेच

खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे, राजेंद्र निकम, मनीषा गायधनी, रूपेश सोनवणे आणि मोहिनी पंडित आदी उपस्थित हेाते.

महापालिकेने १३२ खासगी रुग्णालयातील बेड्स अधिग्रहीत केले आहेत. तसेच गरजवंत रुग्णांना हे बेड्स मिळावेत, यासाठी सेंट्रलाईज्ड बेड सिस्टीम तयार केली असून, सर्व रुग्णालयांनी पोर्टलवर ही माहिती भरणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्णालयांकडून तसे केले जात नसल्याने आता सुमारे सातशे शिक्षकांना हे काम देण्यासाठी नियुक्तीपत्र देण्यात आले असून, कामास नकार देणाऱ्यांवर थेट साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, शिक्षक संघटनांचा त्यास विरोध आहे. शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. तसेच कोविड रुग्णालयात काम करताना त्यांना पीपीई कीट देण्यात आलेले नाहीत. अनेक शिक्षकांचे वय ५५ वर्षांच्या वर आहे. तसेच महिला शिक्षकांना रात्रपाळीची ड्युटी देऊ नये, यासह अन्य अनेक मागण्या यावेळी संघटनेने केल्या. यावर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी शिक्षण विभागाशी चर्चा करून त्यासंदर्भात फेरनियोजन करण्यात येईल. ५५ वर्षांवरील शिक्षकांना रुग्णालयात ड्युटी देण्यात येणार नाही तसेच महिला शिक्षकांना रात्रपाळीत रुग्णालयात ड्युटी देण्यात येणार नाही. बाधित शिक्षक - शिक्षिकांना किंवा ज्या कुटुंबात कोणी संसर्ग बाधित असेल तर त्यांनादेखील रुग्णालयात ड्युटी दिली जाणार नाही, अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले आहे.

कोट..

शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षेचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. त्यामुळे रुग्णालयात ड्युटी देण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे, त्यांना पीपीई किट, सॅनिटायझर आणि अन्य साधने पुरवावीत, अशा अनेक मागण्या होत्या. त्यावर प्रशासनाने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.

- नंदलाल धांडे, खासगी शिक्षक महासंघ

...

छायाचित्र आर फोटोवर १६ टीचर्स--- शिक्षकांना कोविड रुग्णालयात नियुक्त करण्याबाबत मनपा स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्या दालनात झालेल्या चर्चेप्रसंगी सुनीता धनगर, नंदलाल धांडे, राजेंद्र निकम, मनीषा गायधनी, मोहिनी पंडित उपस्थित होते.

===Photopath===

150421\15nsk_41_15042021_13.jpg

===Caption===

शिक्षकांना कोविड रूग्णालयात बाधीत नियुक्त करण्याबाबत मनपा स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या दालनात झालेल्या चर्चेप्रसंगी सुनीता धनगर, नंदलाल धांडे,राजेंद्र निकम, मनीषा गायधनी, मोहिनी पंडीत.

Web Title: Municipal Corporation will provide relief to senior citizens as well as teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.