तुकाराम मुंढे उद्या सादर करणार महापालिकेचे अंदाजपत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:13 PM2018-03-19T14:13:57+5:302018-03-19T14:14:27+5:30

Municipal Corporation's budget to present Tukaram Mundhe tomorrow | तुकाराम मुंढे उद्या सादर करणार महापालिकेचे अंदाजपत्रक

तुकाराम मुंढे उद्या सादर करणार महापालिकेचे अंदाजपत्रक

Next
ठळक मुद्दे महिनाभरापासून घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात उमटण्याची शक्यताउत्पन्नाच्या जमा बाजूनुसारच विकास कामे हाती घेण्याची भूमिका

नाशिक - महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे मंगळवारी (दि.२०) दुपारी २ वाजता होणाऱ्या महासभेत सादर करणार आहे. सव्वा महिन्यापूर्वी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणा-या तुकाराम मुंढे यांच्या अंदाजपत्रकाविषयी नगरसेवकांसह नाशिककरांचीही उत्सुकता वाढली असून गेल्या महिनाभरापासून घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांचे प्रतिबिंब अंदाजपत्रकात उमटण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक माजी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी तयार केले होते आणि २८ फेबु्रवारी अखेर ते सादर होण्याची तयारीही सुरू होती. मात्र, ७ फेबु्रवारीला अभिषेक कृष्ण यांची बदली झाली आणि त्यांच्या जागेवर पदभार स्वीकारणा-या तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रकाची नव्याने जुळणी करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, अभिषेक कृष्ण यांनी १४५१ कोटी रुपयांचे सुधारित आणि १४७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करणार होते. त्यात, त्यांनी घरपट्टी १४ टक्के तर पाणीपट्टीत ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली होती. याशिवाय, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात भांडवली कामांसाठी फारसा वाव राहणार नसल्याचे सूतोवाच करत प्रलंबित कामांनाच गति देण्याचा मनोदय बोलून दाखविला होता. मात्र, तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक नव्याने सादर करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या महिनाभरापासून त्याची तयारी केली. महिनाभरात आपल्या ‘त्रिसूत्री’चा अवलंब करत मुंढे यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. उत्पन्नाच्या जमा बाजूनुसारच विकास कामे हाती घेण्याची भूमिका मुंढे यांनी घेतली आणि त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील नगरसेवक निधीसह २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांनाही कात्री लावली. त्यामुळे, येत्या अंदाजपत्रकात मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’चे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. मुंढे यांच्या अंदाजपत्रकात नेमके दडलेय काय, याबाबत नगरसेवकांसह नाशिककरांचीही उत्सुकता ताणली गेली आहे. त्यामुळे, मंगळवारी (दि.२०) होणा-या महासभेकडे लक्ष लागून राहिले आहे.
 

Web Title: Municipal Corporation's budget to present Tukaram Mundhe tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.