महापालिकेचा छत्तीसावा वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:55 AM2017-11-08T00:55:56+5:302017-11-08T00:56:02+5:30

महापालिकेच्या ३६व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आर. एम. ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला

Municipal Corporation's Chhattis Anniversary | महापालिकेचा छत्तीसावा वर्धापनदिन

महापालिकेचा छत्तीसावा वर्धापनदिन

Next

नाशिक : महापालिकेच्या ३६व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आर. एम. ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला, तर महापालिकेच्या शाळांसाठी फिरत्या प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
महापालिकेच्या स्थापनेला मंगळवारी ३५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मनपा मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. सकाळी मुख्यालयात प्रशासन उपआयुक्त कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते, तर मनपा शिक्षण विभागाच्या वतीने सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व पालकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे, मनसे गटनेता सलीम शेख, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर आदी उपस्थित होते. राजीव गांधी भवन येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी दादासाहेब गायकवाड सभागृहात आर. एम. गु्रपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

Web Title: Municipal Corporation's Chhattis Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.