महापालिकेची व्यापारी संकुलेच ‘ऑन फायर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:16 AM2021-01-25T04:16:01+5:302021-01-25T04:16:01+5:30
भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर सर्वच शासकीय कार्यालयांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने काही वर्षांपूर्वी खासगी रुग्णालयांंना ...
भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेनंतर सर्वच शासकीय कार्यालयांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने काही वर्षांपूर्वी खासगी रुग्णालयांंना फायर ऑडिटची सक्ती करून वेठीस धरण्यात आले होते. मात्र, याच संस्थेच्या रुग्णालयांमध्ये फायर ऑडिट नाहीच परंतु व्यापारी संकुलांमध्येदेखील कोणत्याही प्रकारचे ऑडिट नसल्याचे आढळले आहे. ही व्यापारी संकुले भाड्याने देण्यात आली आहेत. तेथे साफसफाई किंवा अन्य कोणत्याही सुविधा तर दिल्या जात नाहीच, परंतु अग्निशमन प्रतिबंधक सिलिंडर सुद्धा लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथील गाळेधारक आणि त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेततेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यशवंत मंडई ही बाजारपेठेतील महत्त्वाचे व्यापारी संकुल असले तरी त्याला अवकळा आली आहे. शरणपूर पालिका बाजार, शिंगाडा तलाव, महात्मानगर, महात्मा फुले मंडई अशा कोणत्याही ठिकाणी अग्निप्रतिबंधक साधने आढळलेली नाही. केवळ नव्याने सुरू झालेल्या आकाशवाणी केंद्राजवळील भाजीबाजाराच्या ठिकाणी फायर सिलिंडर आढळले हा एक अपवाद वगळला तर अन्यत्र कोठेही फायर सिलिंडर आढळले नाही.
छायाचित्र क्रमांक २१पीएचजेएन ६१- महात्मा नगर, ६३- यशवंत मंडई, ६४ फुले मार्केट, ६५ शिंगाडा तलाव