साहित्य संमेलनासाठी महापालिकेचेही सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:43+5:302021-01-21T04:14:43+5:30
नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणातील इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील पटांगणात होणार आहे. या ...
नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथील गोखले एज्युकेशन संस्थेच्या प्रांगणातील इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील पटांगणात होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्या जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासमवेत सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, नगरसेवक गुरुमित बग्गा, समीर कांबळे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, देवदत्त जोशी, गिरीश नातू, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यामध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली. नाशिक शहरात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आगळ्यावेगळ्या पद्धतीने होऊन एक वेगळा ठसा उमटेल यादृष्टीने सर्वांच्या सहभागातून हे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धारदेखील यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. नाशिकला हे तिसरे संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार असल्याने विशेष दक्षता घ्यावी लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले. या संमेलनासाठी राज्यासह देशातून आणि जगातून येणाऱ्या साहित्यिकांमध्ये नाशिकचा एक वेगळा ठसा उमटेल, अशा पद्धतीने नियोजन केले जाईल. नियोजन करण्याच्या दृष्टीने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, असे यावेळी नमूद करण्यात आले.
फोटो (२० संमेलन पाहणी)
संमेलनस्थळाची पाहणी करताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, गुरुमितसिंग बग्गा आदी.