अस्वच्छतेबद्दल शहरातील २३३ बांधकाम व्यावसायिकांना पालिकेच्या नोटिसा
By admin | Published: June 18, 2014 01:09 AM2014-06-18T01:09:51+5:302014-06-18T01:23:39+5:30
अस्वच्छतेबद्दल शहरातील २३३ बांधकाम व्यावसायिकांना पालिकेच्या नोटिसा
Next
नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली असून, बांधकामाच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवणाऱ्या २३३ बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात साथीचे रोग वाढण्याची भीती असते. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोहीम राबविली जाते. त्यानुसार हिवताप विभागाच्या वतीने ७१ हजार घरांची तपासणी करण्यात आली. २२६ ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळल्याने ही स्थाने नष्ट करण्यात आली. तसेच बांधकामाच्या ठिकाणी अस्वच्छता आणि डास उत्पत्तीची ठिकाणे आढळल्याने २३३ व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)