महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामाला मिळणार चालना आज कंपनीची बैठक : अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 01:12 AM2018-04-11T01:12:56+5:302018-04-11T01:12:56+5:30

नाशिक : महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी (दि.११) होणार आहे.

Municipal corporation's smart city will get its work today: Company's meeting: Many work likely to be approved | महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामाला मिळणार चालना आज कंपनीची बैठक : अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता

महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या कामाला मिळणार चालना आज कंपनीची बैठक : अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देस्मार्ट रोडच्या कामाच्या निविदा महापालिकेने मागवल्या चालना देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होण्याची शक्यता

नाशिक : महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी (दि.११) होणार असून, सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत स्मार्ट रोडच्या कामाला मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्य अनेक प्रकल्पांचा आढावा घेण्यासह नव्या नियुक्त्यांनाही मंजुरी दिली जाणार आहे. कंपनीच्या तज्ज्ञ संचालकपदी माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांच्या नियुक्तीचादेखील प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची सातवी बैठक बुधवारी (दि. ११) होणार आहे. यात अनेक कामांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाक्यापर्यंतच्या स्मार्ट रोडच्या कामाच्या निविदा महापालिकेने मागवल्या असून, त्यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट पार्किंग, मल्टीस्टोअर पार्किंग, शेअर सायकलिंग आणि स्मार्ट लायटिंग प्रोजेक्ट यांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात ३३ ठिकाणी वाहनतळे विकसित केली जाणार असून, या कामांच्या निविदांवरही अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. शहरात शेअर सायकलिंग, ९० हजार एलईडी दिव्यांचा स्मार्ट लाईटिंग, गोदा प्रोजेक्टच्या निविदांवरही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Web Title: Municipal corporation's smart city will get its work today: Company's meeting: Many work likely to be approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.