मनपा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 01:18 AM2019-10-21T01:18:02+5:302019-10-21T01:20:55+5:30
बायोमेट्रिक हजेरीमुळे रखडलेले मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत व कर्मचाºयांना घोषित करण्यात आलेले सानुग्रह अनुदानदेखील वितरीत करण्यात आले आहे.
नाशिक : बायोमेट्रिक हजेरीमुळे रखडलेले मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत व कर्मचाºयांना घोषित करण्यात आलेले सानुग्रह अनुदानदेखील वितरीत करण्यात आले आहे.
मनपातील सर्व कर्मचाºयांचे वेतन बायोमेट्रिक हजेरीद्वारे करण्याचा निर्णय आयुक्तांनी अगोदरच घोषित केला होता. मात्र अंमलबजावणी आॅक्टोबर महिन्यापासून करण्याचे आदेश त्यांनी दिले. परंतु तांत्रिक अडचणींमुळे अनेक कर्मचाºयांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे अन्य कर्मचाºयांनादेखील वेतन मिळणे दुरापास्त झाले होते. मात्र, दिवाळ सण असल्याने आयुक्तांनी हा विषय बाजूला सारून कर्मचाºयांना वेतन दिले. त्यामुळे कर्मचाºयांना दिलासा मिळाला त्यानंतर गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही १४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित झाले असले तरी प्रत्यक्षात ते हाती पडले नसल्याने कर्मचाºयांत अस्वस्थता होती. परंतु शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवसांत तेदेखील अदा झाले आहे.