झेरॉक्स नगरसेवकांमुळे महापालिका कर्मचारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:09 AM2018-12-16T01:09:16+5:302018-12-16T01:09:36+5:30

पंचवटीत प्रभाग समिती सभापती पूनम धनगर यांच्या पती आणि भावाविषयी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे दाद मागितली असताना दुसरीकडे मात्र सर्वच प्रभागात आणि मुख्यालयातदेखील कमी अधिक प्रमाणात झेरॉक्स नगरसेवकांचा वाढता त्रास असून, कोणत्याही प्रकारची कामे सांगणे आणि ती न केल्यास प्रशासनाकडे चौकशीचे अर्ज देणे असे प्रकार सुरू असल्याने प्रशासनातील कर्मचारी त्रस्त आहेत. यातील काहींनी कर्मचारी संघटनांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

Municipal employees suffer due to Xerox corporators | झेरॉक्स नगरसेवकांमुळे महापालिका कर्मचारी त्रस्त

झेरॉक्स नगरसेवकांमुळे महापालिका कर्मचारी त्रस्त

Next
ठळक मुद्देआयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष : भाजपाकडून मौनच

नाशिक : पंचवटीत प्रभाग समिती सभापती पूनम धनगर यांच्या पती आणि भावाविषयी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे दाद मागितली असताना दुसरीकडे मात्र सर्वच प्रभागात आणि मुख्यालयातदेखील कमी अधिक प्रमाणात झेरॉक्स नगरसेवकांचा वाढता त्रास असून, कोणत्याही प्रकारची कामे सांगणे आणि ती न केल्यास प्रशासनाकडे चौकशीचे अर्ज देणे असे प्रकार सुरू असल्याने प्रशासनातील कर्मचारी त्रस्त आहेत. यातील काहींनी कर्मचारी संघटनांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांपेक्षा झेरॉक्स नगरसेवकांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. पंचवटीत सभापती पूनम धनगर यांचे पती आणि बंधू हे सफाई कामगार आणि उद्यान विभागातील कर्मचाºयांना त्रास देत असल्याचे कर्मचाºयांनीच महापौरांना सांगितले असले तरी स्वपक्षीय नगरसेवकाविषयी कठोर भूमिका घेणे महापौरांना शक्य झाले नसून त्यांनी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना अहवाल दिला आहे. सानप यांनी मात्र त्यावर कोणतीही कृती केलेली नाही. केवळ पंचवटीतच नव्हे तर अन्य काही विभागांत आणि महापालिकेच्या मुख्यालयातदेखील झेरॉक्स नगरसेवकांचा सुळसुळाट झाला आहे.
कार्यालयीन कामात हस्तेक्षप
महापालिकेच्या विविध विभागांत जाऊन फाइली हाताळणे तसेच कागदपत्रे तपासणे यांसारखी कामे झेरॉक्स नगरसेवक करतात. अनेकदा नगरसेवकांची कोरे शीर्षपत्र त्यांच्याकडे असतात. त्यावर काहीही लिहून पत्रे दिली जात असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

Web Title: Municipal employees suffer due to Xerox corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.