पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईला सुरुवात; अनधिकृत बांधकामांवर हातोडा

By Suyog.joshi | Published: September 6, 2023 03:52 PM2023-09-06T15:52:48+5:302023-09-06T15:53:51+5:30

नाशिक पालिका क्षेत्रातील कामगिरी

Municipal encroachment department begins action; Hammer on unauthorized constructions | पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईला सुरुवात; अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईला सुरुवात; अनधिकृत बांधकामांवर हातोडा

googlenewsNext

नाशिक (सुयाेग जोशी) : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेरीस कारवाईस सुरुवात केली असून पूर्व विभागात पक्क्या बांधकामांवर हातोडा चालवला आहे. पूर्व विभागातील स.न. ४६५/२ ते ९, काठे गल्ली येथील खुल्या जागेमधील अर्धवट जुन्या बांधकामातील अतिक्रमणांवर मंगळवारी (दि.५) ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईमध्ये ३ ट्रॅक्टर व १ जेसीबीमार्फत सदरचे अनधिकृत बांधकाम काढण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम निष्कासित करताना कायदा व सुव्य़वस्थेच्या दृष्टिकोनातून मनपा दैनंदिन पोलिस बंदोबस्त, तसेच मनपाचे विभागीय अधिकारी पूर्व राजाराम जाधव व नगर नियोजन विभागाचे उपअभियंता उपस्थित होते.

नाशिक पश्चिम विभागातील मौजे नाशिक गावठाणतील स.ने. ८२५ अ. घ. नं. ५७२ अ येथील रीना नवले यांनी केलेले अनधिकृत बांधकाम त्यांनी स्वत:च हटवल्याने या ठिकाणी बांधकाम तोडण्याची मोहीम रद्द करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतधारकांना यापूर्वी अनधिकृत - अतिक्रमणविषयी नोटीस प्राप्त झाली असेल किंवा ज्या मिळकतधारकांनी अनधिकृत बांधकाम- अतिक्रमण केले असेल अशा मिळकतधारकांनी स्वत:हून अनधिकृत-अतिक्रमित बांधकाम काढून घ्यावे, असे आवाहन उपआयुक्त नितीन नेर यांनी सांगितले आहे.

Web Title: Municipal encroachment department begins action; Hammer on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक