मनपा इंग्रजी शाळेतील शिक्षक वेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:12+5:302021-07-29T04:14:12+5:30
मनपात वेळोवेळी चकरा मारून निवेदन देऊन न्याय मिळत नाही नाशिक मनपात इंग्लिश मीडियम ५ शाळा आहे. त्यातील दोन शाळा ...
मनपात वेळोवेळी चकरा मारून निवेदन देऊन न्याय मिळत नाही नाशिक मनपात इंग्लिश मीडियम ५ शाळा आहे. त्यातील दोन शाळा बंद आहे एकीकडे नाशिक शहरात खासगी इंग्लिश मीडियम स्कूलच्या लाख रुपये फी घेऊन विद्यार्थ्यांना शिकवले जाते; मात्र नाशिक महानगरपालिकेच्या इंग्लिश मीडियम शाळा असताना २ शाळा बंद पडल्या तर ३ शाळेतील शिक्षकांना ३ वर्षांपासून वेतन मिळालेले नाही. येत्या १५ दिवसात शिक्षकांना त्यांचे वेतन मिळाले नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रहार नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, जगन काकडे, नितीन गवळी, दिलीप पाटील, संजय तिवडे, शिल्पा झरेकर, यमुना लिंगायत, छाया चौधरी, नाना दोंदे, अनंता उपाध्ये, प्रवीण महाले, पुंडलिक महाले, संगीता उशिरे, पुष्पा वाघ, वंदना अहिरे आदी उपस्थित होते.