महापालिकेच्या सभा, बैठका ऑनलाईनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:40+5:302021-06-29T04:11:40+5:30

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शासनाने काहीसे निर्बंध शिथिल केले असले तरी, डेल्टा प्लस या नवीन विषाणूचा संसर्ग झपाट्याने ...

Municipal meetings, meetings only online | महापालिकेच्या सभा, बैठका ऑनलाईनच

महापालिकेच्या सभा, बैठका ऑनलाईनच

googlenewsNext

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शासनाने काहीसे निर्बंध शिथिल केले असले तरी, डेल्टा प्लस या नवीन विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरू लागल्यामुळे शासनाने पुन्हा निर्बंधाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच गेल्या १५ महिन्यांपासून महापालिकेच्या महासभा, स्थायी समितीची बैठक, विषय समित्यांच्या बैठका प्रत्यक्ष सभागृहात न होता ऑनलाईन पद्धतीने होत असून, या ऑनलाईन महासभांचे अनेक प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. अनेक वेळेला नेटवर्क नसणे, सभासदांची भूमिका महापौर, आयुक्त तसेच संबंधित विभागप्रमुख व अन्य सदस्यांपर्यंत तांत्रिक अडचणींमुळे पोेहोचत नाही. त्यामुळे महासभा ऑफलाईन घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली होती. त्यावरून नगरसचिव विभागाने राज्यशासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवले होते. नगरविकास विभागाचे अप्पर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठवत, ऑफलाईन महासभा घेण्यास नकार दिला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आणि त्यात डेल्टा प्लस विषाणूचा धोका लक्षात घेता गर्दी करणे व एकत्रित कार्यक्रम व बैठका टाळाव्यात असा सूचना त्यांनी महापालिका आणि नगरपरिषदांना दिल्या आहेत.त्यामुळे महासभा, बैठका ऑनलाईनच घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी सर्व महापालिका व नगरपालिकांना दुसऱ्यांदा दिले आहेत.

Web Title: Municipal meetings, meetings only online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.