राजर्षी शाहू महाराज यांचे मनपा स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:17+5:302021-06-28T04:11:17+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवले व त्यानंतर ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवले व त्यानंतर त्यांचा वसा पुढे चालू राहावा याकरिता खऱ्या अर्थाने हे हिंदवी स्वराज्य लोककल्याणकारी असावे याकरिता छत्रपती शाहू महाराजांनी आटोकाट प्रयत्न केले अशा लोककल्याणकारी राजाचे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारकाची शहरात गरज आहे. या स्मारकाकरिता शहरात सुयोग्य जागा निश्चित करून स्मारक उभारण्यात येईल व त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची अर्थसंकल्पामध्ये तरतूद धरण्यात येणार आहे. तसेच स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करणार येईल, असे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी सांगितले.
मनपा मुख्यालय झालेल्या कार्यक्रमात सभागृह नेते कमलेश बोडके यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, नगरसचिव राजू कुटे आदी उपस्थित होते.