महापालिकेने केला मोबाइल टॉवर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:22 AM2019-06-22T00:22:08+5:302019-06-22T00:22:32+5:30

महापालिकेने बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात पुन्हा मोहीम तीव्र केली असून, शुक्रवारी (दि.२१) पंचवटी विभागात दोन बेकायदेशीर बांधकाम हटवितानाच मोबाइल टॉवरदेखील जमीनदोस्त केले आहे.

 Municipal Mobile Phones Sealed | महापालिकेने केला मोबाइल टॉवर सील

महापालिकेने केला मोबाइल टॉवर सील

Next

नाशिक : महापालिकेने बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात पुन्हा मोहीम तीव्र केली असून, शुक्रवारी (दि.२१) पंचवटी विभागात दोन बेकायदेशीर बांधकाम हटवितानाच मोबाइल टॉवरदेखील जमीनदोस्त केले आहे.
नाशिक शहरात लोकसभा निवडणुकीमुळे थंडावलेली अतिक्रमण विरोधी मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि.२१) पंचवटी विभागातील कोणार्कनगर येथील पंचकृष्ण लॉन्सजवळ बलसागर सोसायटीतील दोन बेकायदा बांधकामे हटविण्यात आली, तर दुसरीकडे पंचवटीतच दालवाला आर्केड, मालवीय चौक, येथील बेकायदेशीर मोबाइल टॉवर सील करणेत आले.
शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा मोबाइल टॉवर्स असून, महापालिकेची कोणतीही परवानगी न घेताच ते उभारण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता बेकायदेशीर मोबाइल टॉवरची शोध मोहीम राबविण्यासाठी एजन्सी नेमण्याचा प्रस्तावदेखील दिला
आहे. परंतु आताही बेकायदेशीर मोबाइल टॉवरची तक्रार आल्यास ते सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

Web Title:  Municipal Mobile Phones Sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.