महापालिकेच्या घरपट्टी वसुलीत २२ कोटींनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:51 AM2020-01-15T01:51:52+5:302020-01-15T01:52:50+5:30
महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत १० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर घरपट्टीच्या वार्षिक उद्दिष्टापैकी ११६ कोटी रुपये वसूल झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २२ कोटी ४४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, आत्तापर्यंत १० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर घरपट्टीच्या वार्षिक उद्दिष्टापैकी ११६ कोटी रुपये वसूल झाले असून, गतवर्षीच्या तुलनेत २२ कोटी ४४ लाख रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे.
शहरातील अनेक मिळकतदारांकडे कोट्यवधी रुपयांची घरपट्टी थकली असून, ती वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. काही मिळकतींचे लिलावदेखील करण्यात येत आहेत. मात्र गेल्यावर्षी प्रथमच थकीत रकमेवरील शास्तीत (दंडात) सवलत देण्याची अभय योजना राबविण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. गेल्यावर्षी राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात १६ कोटी रुपये महापालिकेला मिळाले होते. तर आता दुसºया टप्प्यात डिसेंबरपासून १४ जानेवारीपर्यंत १० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे केवळ अभय योजनेमुळे महापालिकेच्या तिजोरीत २६ कोटी रुपयांची भर पडली आहे. सध्या सुरू असलेल्या टप्प्यात २२ हजार ३६८ थकबाकीदारांनी १० कोटी ११ लाख ८८ लाख ९९२ हजार रुपये भरले आहेत.