शहर बससेवेसाठी मनपाच्या हालचालीआयुक्त अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 05:10 PM2017-10-10T17:10:37+5:302017-10-10T17:10:43+5:30

Municipal movements for city bus services are favorable | शहर बससेवेसाठी मनपाच्या हालचालीआयुक्त अनुकूल

शहर बससेवेसाठी मनपाच्या हालचालीआयुक्त अनुकूल

Next
ठळक मुद्देसल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू


नाशिक : शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून, बुधवारी (दि.११) त्याबाबत संबंधित एजन्सीसमवेत तांत्रिक बोली होणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे, अशी अनुकूल भूमिका आयुक्तांनी घेतल्याने बससेवा ताब्यात घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत.
सद्यस्थितीत राज्य परिवहन महामंडळामार्फत शहर बससेवा चालविली जात आहे. परंतु, शहर बससेवा तोट्यात जात असल्याने महामंडळाने आजवर वारंवार बससेवा बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत अनेक मार्गांवरील बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या एप्रिलनंतर बससेवा पूर्णपणे बंद करण्याचा अल्टिमेटमही महामंडळाने दिला आहे. या साºया पार्श्वभूमीवर महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी सल्लागार एजन्सी नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी त्यासंदर्भात एजन्सीसमवेत तांत्रिक बोली प्रक्रिया राबविली जाणार आहे. सदर सल्लागाराला तीन महिन्यांचा अवधी दिला जाणार असून, त्याच्याकडून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. याबाबत आयुक्तांनी सांगितले, शहर बससेवा महापालिकेनेच चालविली पाहिजे. परंतु, ती चालविणे बंधनकारकही नाही. महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घेताना ती कोणत्या पद्धतीने चालविली पाहिजे, यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेपुढे दोन-तीन पर्याय आहेत. त्यात महापालिका स्वत: बससेवा चालवू शकते अथवा भाडेतत्त्वावर किंवा पीपीपीमार्फत बससेवा चालविली जाऊ शकते. त्याबाबतचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Municipal movements for city bus services are favorable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.